Increase the capacity of Kovid Hospitals in Shirdi | शिर्डीतील कोविड रुग्णालयांची क्षमता वाढवा

शिर्डीतील कोविड रुग्णालयांची क्षमता वाढवा

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या सहकार्याने कोविडसंदर्भात शिर्डीत देशातील सर्वांत चांगली सोय होऊ शकते. यासाठी शिर्डीतील कोविड रुग्णालयांची क्षमता वाढवा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाच्या आढावा बैठकीत रविवारी दिली.

रेमडेसिविरचे जिल्हास्तरावरून रुग्णसेवेच्या प्रमाणात वितरण करण्यात येईल. हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार व आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार देण्यात येत आहे की नाही याबाबत खात्री करण्यात येईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. कुंदन गायकवाड, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Increase the capacity of Kovid Hospitals in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.