संत नामदेव जयंतीचा समावेश शासकीय यादीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:19 AM2021-03-07T04:19:54+5:302021-03-07T04:19:54+5:30

अहमदनगर : मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तिंच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात १४ जानेवारी ...

Include Sant Namdev Jayanti in the government list | संत नामदेव जयंतीचा समावेश शासकीय यादीत करा

संत नामदेव जयंतीचा समावेश शासकीय यादीत करा

Next

अहमदनगर : मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तिंच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात १४ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक व थोर पुरुषांची यादी जाहीर केली आहे. या यादीत संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव नसल्याने वारकरी संप्रदायातील लाखो लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या जयंतीचा उल्लेख यादीत करावा, अशी मागणी शिंपी समाजाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी पीराजी सोरमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी डावरे गल्ली अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, विश्वस्त ज्ञानेश्वर कविटकर, दिलीप गीते, भिंगार अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे व शिंदे मळा सावेडीचे सचिव राजेंद्र बगाडे उपस्थित होते. याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी मराठी साहित्यातील अनेक दालनांचा शुभारंभ केला. मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक, आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार याशिवाय महाराष्ट्रीय हिंदी कवी, हिंदी भाषेचे आद्यप्रचारक आद्य व श्रेष्ठ कीर्तनकार, आद्य अस्पृश्योद्धारक व आद्य फडकरी म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांचा गौरव करण्यात आला होता. त्याकाळी संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका भारतभर फिरवली. भागवत धर्म त्यांनी पंजाब, गुजरात, राजस्थानमध्ये नेला, रूजवला आणि जगवला. गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथात संत शिरोमणी नामदेव महाराजांची पदे समाविष्ट आहेत. संत नामदेव महाराज म्हणजे हिंदू आणि शीख यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. संत नामदेव हे खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत. त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे काम करणाऱ्या संत नामदेवांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या थोर पुरुष व संताच्या यादीत नसणे हे आकलनीय आहे. शासनाने आपली चूक त्वरित सुधारून संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव यादीत समाविष्ट करावे. याबाबतचे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप यांनाही देण्यात आले आहे, असे मांढरे यांनी सांगितले. ----

श्री नामदेव शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज यांच्या जयंतीदिनाचा शासकीय यादीत समावेश करण्याची मागणी अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे यांना दिले. यावेळी श्रीकांत मांढरे, ज्ञानेश्वर कविटक, दिलीप गीते उपस्थित होते.

-

फोटो- ०६ नामदेव शिंपी समाज

Web Title: Include Sant Namdev Jayanti in the government list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.