रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

By अरुण वाघमोडे | Published: July 10, 2024 05:14 PM2024-07-10T17:14:53+5:302024-07-10T17:16:41+5:30

महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा ८ जुलैला शासन आदेश निघाला होता.

in ahmednagar municipal commissioner changed within 24 hours before joining | रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

अरुण वाघमोडे,अहमदनगर : महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा ८ जुलैला शासन आदेश निघाला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा आदेश रद्द करीत आयुक्तपदी पिंपरी चिंचवडी महापालिकेतील सहायक आयुक्त यशवंत डांगे यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला आहे.

नगर विकास विभागातील उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी डांगे यांच्या नियुक्तीचे बुधवारी (दि.१०) आदेश काढला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी २७ जूनला गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून जावळे मनपामध्ये हजर नाहीत. त्यानंतर नगरविकास विभागाने अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविला होता. आयुक्त पदावर कुणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशाच पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. त्यानंतर हा आदेश रद्द करीत डांगे यांची नियुक्ती झाली. दरम्यान, डांगे यांनी दोन वर्षे महापालिकेत उपायुक्त कार्यरत होते. त्यामुळे त्यांना येथील कामकाजाचा व शहरातील प्रश्नांचा चांगला अभ्यास आहे.

Web Title: in ahmednagar municipal commissioner changed within 24 hours before joining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.