शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

आगामी राजकीय क्रांतीमध्ये धनगर समाजाचा महत्वाचा सहभाग : डॉ. इंद्रकुमार भिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:06 PM

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणा-या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केले

अहमदनगर : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणा-या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड. अरुण जाधव, अ‍ॅड.रावसाहेब मोहन, डॉ. सुधीर क्षीरसागर, प्रकाश भोसले, दादासाहेब साठे, सुधीर वैरागर, डॉ. जालिंदर घिगे विचारपीठावर उपस्थित होते.डॉ. भिसे म्हणाले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धनगर समाजाचे अतूट नाते आहे. राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षणाचा विचार केलेला आहे. समाजातील वंचित घटकांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला सत्तेचे शिखर गाठता येणार नाही. या विचारातून स्थापना झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय लढाईमध्ये धनगर समाज उत्फुर्तपणे सहभागी होईल असे ते म्हणाले. प्रा. किसन चव्हाण म्हणाले, वंचित बहुजन आघाडी नगर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिणेतील सर्व गावापर्यंत पोहचणार आहे. वातावरण निर्मितीसाठी दक्षिण व उत्तर लोकसभा मतदार संघात १ हजार कार्यकर्त्यांची मोटर सायकल रॅली काढून मतदार संघ ढवळुन काढण्यात येईल. आघाडीच्या झंझावाती वाटचालीत खोडा घालणा?्या सूयार्जी पिसाळांना आम्ही आडवे करून अडथळ्यांची शर्यत पार करू असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.डॉ. सुधीर क्षिरसागर, अ‍ॅड. रावसाहेब मोहन, दादासाहेब साठे (श्रीरामपूर), प्रकाश भोसले (शेवगाव), संजय भालेराव, बापूराव ताजने (संगमनेर), बापूसाहेब गायकवाड (जामखेड), प्रमोद काळे (श्रीगोंदा), सुधीर वैरागर (नेवासा), वसंत बोर्डे, हुमायून आतार, रामराव चव्हाण (पाथर्डी), संदीप मोकळ, विश्वास वैरागर, चंद्रकांत जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर