Immediate irrigation should be done on the evidence of the crops - Vijay Vadettiwar | पिकांचे पुराव्यानिशी तातडीने पंचनामे करावेत-विजय वडेट्टीवार 
पिकांचे पुराव्यानिशी तातडीने पंचनामे करावेत-विजय वडेट्टीवार 

राहुरी : पावसामुळे शेतातील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे़. अधिका-यांनी तातडीने पुराव्यासह पंचनामे करून सादर करावेत़. शासनाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़. वेळेप्र्रसंगी दबाव आणून शेतक-यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़.
विरोधी पक्षनेते वडेटटीवार यांनी रविवारी राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात आधिका-यांच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला़. वडेट्टीवार म्हणाले, पावसामुळे राज्यावर मोठे संकट आले आहे़. अशा परिस्थीतीत काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस शेतक-यांच्या पाठीशी आहे़. बिकट परिस्थीतीत शेतक-यांना शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल़. त्यासाठी आधिका-यांनी वेळ निघून जाण्याच्या आगोधर पंचनामे करावेत़. कपाशी, सोयबीन, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या  प्रमाणावर नुकसाने झाले आहे़. आम्ही सत्तेवर असू किंवा नसू. मात्र दोन्ही काँगे्रस शेतक-यांच्या बाजूने आहोत़. राज्यावर नैसर्गिक संकट आले आहे़ अधिका-यांनी पंचनामे व्यवस्थित करावेत अन्यथा निलंबित केले जाईल. उंबरे ब्राम्हणी भागात पावसामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे़. शेतक-यांना योग्य प्रमाणावर भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा केला जाईल़.
पंचायत समितीच्या सभागृहात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वागत केले़. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषि आधिकारी महेंद्र ठोकळे, बाळासाहेब आढाव, नंदु गागरे, प्रकाश देठे, अमोल जाधव  उपस्थित होते़.
विरोधी पक्षनेते विजय वडेवटटीवार यांनी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीला भेट दिली़. सभापती अरूण तनपुरे यांनी स्वागत केले़. उपसभापती आण्णासाहेब गागरे, रामदास माने, एकनाथ तनपुरे  उपस्थित होते़.
ब्राम्हणीत पिकांची पाहणी 
 वडेटटीवार यांनी उंबरे व ब्राम्हणी येथील शेतकरी नारायण हापसे, विश्वनाथ तारडे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पहाणी केली़. पावसामुळे कपाशी, मका, बाजरी या पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली़. 

Web Title: Immediate irrigation should be done on the evidence of the crops - Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.