समाजातील जाती-धर्मांचं विष तरूणांनी ओळखावं : अनिकेत आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 04:45 PM2018-06-09T16:45:31+5:302018-06-09T16:45:31+5:30

Identify the communities of caste and religion in the community: Aniket Amte | समाजातील जाती-धर्मांचं विष तरूणांनी ओळखावं : अनिकेत आमटे

समाजातील जाती-धर्मांचं विष तरूणांनी ओळखावं : अनिकेत आमटे

googlenewsNext

अहमदनगर : संघटना कोणतीही असो ती माणसांची हवी, कोणत्याही जाती-धर्माची नसावी. त्यातून देशविकासात हातभार लागावा. परंतु आज समाजात जाती-धर्माचं विष पेरलं जात असून त्यातून समाज भरकटतो आहे. त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याची व देशाला या कलुषित वातावरणातून बाहेर काढण्याची जबाबदारी युवकांवर आहे, असा सल्ला समाजसेवक व आमटे घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वारसदार अनिकेत आमटे यांनी दिला.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी नगरमध्ये आयोजित राज्यस्तरीय नवशक्ती युवा संवाद व सन्मान सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, पत्रकार प्रदीप पेंढारे, अंजली वल्लाकट्टी उपस्थित होते. आमटे पुढे म्हणाले की, ‘उपेक्षित’ हा शब्द जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत लोकांचा विकास होणार नाही. कारण आज मूलभूत प्रश्न तसेच पडून आहेत. बाबा आमटे यांनी माणुसकीच्या सेवेचा घेतलेला वसा त्यांचे पूत्र प्रकाश आमटे यांनी यशस्वीपणे सांभाळला, किंबहुना तो पुढे नेला. आता आमची पिढीही त्याच वाटेने जात आहे. सामाजिक कामात अडचणी येतील, पण त्यावर मात करून पुढे जा. शिक्षणामुळे परिवर्तन घडतं, त्यामुळे युवकांनी शिकून परिवर्तनाची वाट धरावी, असे सांगत त्यांनी अमृतवाहिनीच्या उत्कृष्ट कामाचेही कौतूक केले.
सुधीर लंके यांनी युवकांना आपली ताकद ओळखण्याचे आवाहन केले. युवक देशाचे चित्र बदलू शकतात. पण त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे. आजच्या व्यवस्थेत आपल्यावर सामाजिक संस्कार होतात का हे तपासावे लागेल. काही संघटना, राजकीय पक्ष समाजात जाणूनबुजून विसंवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खरा राष्ट्रवाद काय आहे, हे समजावून सांगण्याची जबाबदारी युवकांवर आली आहे. आपण व्यवहारिक जीवनात विज्ञानाचा वापर करतो, परंतु विज्ञाननिष्ठेने वागत नाही. त्यामुळे युवकांनी प्रथम स्वत:त परिवर्तन घडवून समाज परिवर्तनासाठी तयार रहावे, असे आवाहन करत त्यांनी सोशल मीडियाचे माध्यम त्यासाठी सकारात्मक पद्धतीने वापरण्याचा कानमंत्र दिला.
प्रितमकुमार बेदरकर यांनी अमृतवाहिनी संस्थेचा परिचय करून दिला. शारदा होशिंग, संजय शिंगवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अमोल राठोड यांनी सूत्रसंचालन केले. तर संस्थेचे दिलीप गुंजाळ यांनी आभार मानले.

चार मानवसेवकांचा सन्मान
अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने खºया अर्थाने मानवांची सेवा करणाºया चार संस्थांचा गौरव करण्यात आला. यात अहमदनगर येथील पारधी, भिल्ल समाजातील मुले मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाºया केअरिंग फें्रडस् संस्थेचे संस्थापक अंबादास चव्हाण, सोलापूर येथे अनाथ मुलांसाठी काम करणाºया स्नेहग्राम प्रकल्पाचे महेश निंबाळकर, कोल्हापूर येथे मनोयात्री रूग्णांसाठी झोकून देणारे माणुसकी फाऊंडेशनचे अमित प्रभा वसंत, तर नाशिक येथे स्वत: अनाथाश्रमात लहानाचे मोठे होऊन आता मानवधर्म फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथांची सेवा करणाºया सुलक्षणा नाना आहेर यांचा संस्थेच्या वतीने नवशक्ती मानवसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

Web Title: Identify the communities of caste and religion in the community: Aniket Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.