शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
2
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
3
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
4
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
5
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
6
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
7
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
8
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
9
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
10
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
11
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
12
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
13
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
14
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
15
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी
16
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
17
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
18
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
19
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
20
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

राहुरीत पत्रकार, व्यापारी, नागरिकांवर गुंडांचा हल्ला, जिल्हाभरातून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 9:46 AM

राहुरी शहरात मोटारसायकल चोरताना एका गुंडाला रंगेहात पकडल्यानंतर त्याला सोडून नेण्यासाठी पाचशे ते सहाशे जणांनी एक तास धुमाकूळ घालत दंगल केली.

अहमदनगर: राहुरी शहरात मोटारसायकल चोरताना एका गुंडाला रंगेहात पकडल्यानंतर त्याला सोडून नेण्यासाठी पाचशे ते सहाशे जणांनी एक तास धुमाकूळ घालत दंगल केली. यावेळी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांसह व्यापारी व इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, राहुरीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी संजय मोहन मोटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  या घटनेनंतर पोलिसांनी विजय अहिरे व आकाश माळी या दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. संजय मोटे यांचे नगर-मनमाड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आईस्क्रीमचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान एक चोरटा मोटे यांची दुचाकी नेत असताना त्यांचा मुलगा ऋषीकेश याने पाहिले. ऋषीकेश याने या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी त्या चोरट्याला सोडण्यासाठी गुंडांचा मोठा जमाव शहरातील पृथ्वी कॉर्नर परिसरात जमा झाला. त्यांनी गज, काठ्या, तलवारी, सत्तुर या हत्यारांनी नागरिकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. परिसरातील दुकानांचीही तोडफोड केली. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांनाही गुंडांनी बेदम मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांची दुचाकीही ओढून नेण्याचा प्रयत्न झाला. या मारहाणीत येवले यांच्यासह प्रकाश चव्हाण, विजय वेताळ, ऋषीकेश मोटे, विजय मोटे व इतर दहा ते पंधरा नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. काही नागरिक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकले नाहीत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा गुंड घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने राहुरीत दाखल झाले. ---लोकप्रतिनिधींकडून कारवाईची मागणी या घटनेनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी रात्री राहुरीत येत पोलिसांची भेट घेऊन चोºया व दंगल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली. राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी जखमींना दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यांनीही पोलिसांना धारेवर धरले. राहुरीत गुन्हेगार मोकाट असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, सत्यवान पवार, भाऊसाहेब साबळे, चाचा तनपुरे यांसह अनेक नेत्यांनी पोलीस स्टेशनला येऊन निषेध नोंदविला. ............पत्रकारांसह व्यापा-यांकडूनही कारवाईची मागणी ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, जाहिरात व्यवस्थापक रवींद्र जरे, मंगेश कटके यांनीही पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. ‘लोकमत’ने तातडीने पोलीस अधीक्षकांशी संपर्क करुन घडल्या प्रकाराची माहिती दिली. राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राहुरी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर, राहुरी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनील रासने यांसह तालुक्यातील सर्व पत्रकार, राहुरी व्यापारी संघटना, पॅथॉलॉजी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा एकीकरण, प्रहार अपंग संघटना, यशवंत सेना, डॉक्टर असोसिएशन, शेतकरी संघटना आदी संघटनांच्या पदाधिका-यांनी मारहाण झालेले नागरिक व पत्रकार यांना दिलासा देत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली...............आज राहुरी बंदची हाक राहुरी येथे पत्रकार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना गुंडांनी विनाकरण मारहाण करून दंगल करत दहशत निर्माण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी असोसिएशनसह नागरिकांनी शहर बंदची हाक दिली आहे. .........पत्रकार संघटना घेणार पोलीस अधीक्षकांची भेट राहुरी येथे ज्येष्ठ पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा निषेध व या घटनेतील सर्व गुंडांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार आहे. .................पोलिसांनी कोणत्याही दबावाला भीक न घातला आरोपींवर कारवाई करावी. राहुरीत अनेक पोलीस ब-याच वर्षांपासून येथेच आहेत. त्यांचा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. या सर्वांच्या बदलीची मागणी आपण करणार आहोत. कुणीही आरोपींची पाठराखण करुन वातावरण बिघडू नये. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. - शिवाजी कर्डिले, आमदार............पत्रकाराला जेव्हा गुंड मारहाण करतात. तेव्हा सामान्य नागरिकाची काय परिस्थिती असेल. राहुरीत चोरीचे अनेक प्रकार होतात. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे धैर्य वाढत चालले आहे. आजची घटना म्हणजे कळस गाठला गेला आहे. - प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर