नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी

By सुदाम देशमुख | Published: January 24, 2024 10:14 AM2024-01-24T10:14:02+5:302024-01-24T10:15:30+5:30

मृतांमध्ये दोन जण पारनेरचे तीन जण संगमनेरचे तर एक पाथर्डीचा

Horrible accident on Nagar Kalyan Highway Six people were killed on the spot, three people were injured | नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी

नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात! सहा जण जागीच ठार, तीन जण जखमी

अहमदनगर: कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्यावर बुधवारी पहाटे तीनच्या दरम्यान  एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून, यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

ढवळपुरी फाट्या नजीक हिवरे कोरडा शिवारातबस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला असून या  तालुक्यात भयानक अपघात ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांतील मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातील तर तिघेजण संगमनेर तालुक्यातील एक जण पाथर्डी तालुक्यातील आहे.तर स्थानिक तरुण मदत करत असताना पत्रा लागल्याने १ जण जखमी झाला आहे.

या अपघातात निलेश रावसाहेब भोर -देसवडे ,प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता- पारनेर )अशोक चिमा केदार  जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी-जांबुत खुर्द ( ता - संगमनेर) सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी ) हे मयत झाले आहेत, तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्र लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी देवेंद्र गणपत वाडेकर, व बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेतया घटनेची माहिती मिळतात सहा.पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनाही दाखल होऊन पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात  उत्तरीय तपासणी होणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पाणी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

हिवरे कोरडा शिवारात पहाटे तीनच्या सुमारास एसटी बस ठाणेहून नगरला येत असताना समोर उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला होता त्याला दुसरा ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर पुढे लावून त्यातील मजूर मदत करत होते हे पाहून इको कार चालक थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता त्यावेळी एसटी बस व ट्रॅक्टर ईको गाडीला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे

Web Title: Horrible accident on Nagar Kalyan Highway Six people were killed on the spot, three people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात