शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

हुरडा, हुळा अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 4:15 PM

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू पिके येतात. ज्वारीचे पीक साधारणत: दरवर्षी १५ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत फुलोऱ्यात असतात.

अनिल लगडअहमदनगर : ज्वारी पीक फुलो-यात आले की बळीराजा गोफण घेऊन धानावरची पाखरं हाकायला तयार होतो. जोरजोरात हरोळ्या टाकून बळीराजा या पाखरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळतो. अनेक ठिकाणी शेतात बुजगावणे देखील पहायला मिळतात. मात्र तरी देखील काही पक्षी या फुलो-यात आलेल्या ज्वारीचा आनंद घेतात, त्याच पद्धतीने अनेक हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात. स्पर्धेच्या युगात ही हुरडा पार्टी आता शेतातून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आली आहे. एवढेच नाहीतर आता शालेय पातळीवर देखील विद्यार्थ्यांना हुरडा, हुळा पार्टीचे धडे मिळू लागले आहेत.

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू पिके येतात. ज्वारीचे पीक साधारणत: दरवर्षी १५ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत फुलोऱ्यात असतात. या दिवसात हरभरा, गहू पिकेही बहरलेली असतात. ज्वारीचे दाणे कोवळे झाले की सर्वांना हुरड्याची आठवण होते. हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस गोव-याच्या निखा-यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. धावपळीच्या युगात आता हुरडा आणि हुळा पार्टीला मोठे महत्व आले आहे. हरभरा कोवळ्या दाण्याचा हुळा केला जातो. पाल्यासकट हरभरा शेकटीत भाजला जातो. त्यानंतर एक एक घाटा उचलून खालला जातो. त्याची चवही न्यारीच असते. गव्हाच्या ओंब्यापासून गव्हाचा हुरडाही तयार केला जातो. तो ही चवीला चांगला व आरोग्यवर्धक समजला जातो. त्यामुळे त्याला सध्या महत्व आले आहे.आम्ही पूर्वी आमच्या शेतात आजोबा, चुलत्यांबरोबर हुरडा खायला जात असत. शेतात गेल्यावर आम्हाला प्रथम गोवºया गोळा कराव्या लावी. आम्ही जवळजवळ पोतेभर गोव-या गोळा करून आणत. त्यानंतर घरातील मंडळी सायंकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी ज्वारीचे कोवळी कणसे आणून गोव-याच्या शेकोटीत भाजत. भाजल्यानंतर एका पोत्यावर आमचे चुलते, वडील हातावर हुरडा चोळीत. त्यांच्या हाताला चटेक बसत असत. परंतु आम्हाला गरमगरम हुरडा खाऊ घालीत. याबरोबर आमच्या आजीने उखळात तयार केलेली खोब-याची चटणी देखील असे. या चटणीची आणि हुरड्याची चव देखील आजही मला हुरड्याचे दिवस आले की आठवते. असेच आम्ही हरभरा कोवळा किंवा पक्क झाला की काड्याकुड्यावर जाळून त्याचा हुळाही आम्ही तयार करुन खात असे. हुळा खाताना मात्र बालसवंगड्याची टोळीच रहात. याची चवही न्यारीच रहात.आज स्पर्धेचे आणि धावपळीचे युग आहे. शहरीकरणामुळे अनेकांना हुरडा, हुळ्याचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. परंतु शेतातील हुरडा, हुळा आता रिसॉर्ट किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील आला आहे. ज्वारी पिकांवर कृषी विद्यापीठांनी संशोधन करुन हुरड्याच्या विविध जाती संशोधन केल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुण शेतकºयांनी हुरड्यापासून रोजगार उपलब्ध केला आहे. पॅकिंगमध्ये देखील हुरडा उपलब्ध होत आहे. हा हुरडा विकत घेऊन घरी आणून तव्यावर देखील भाजून खाता येतो. परंतु खरी मजा असते ती शेतात जाऊन शेकोटीत भाजलेल्या हुरड्यातच. परंतु आताच्या शहरी बालगोपालांना हुरडा, हुळ्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पालकांसह, शिक्षकांवर देखील आली आहे. यासाठी त्यांना आता काही शैक्षणिक संस्थांमध्ये देखील याचे प्रात्याक्षिकांसह धडे दिले जात आहेत.नगर जिल्ह्यातील राहाता शहरातील प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या सात दिवसांपासून हुरडा व हुळा सप्ताह साजरा करण्यात आला. डांगे पॅटर्नचे इंद्रभान डांगे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या सुमारे १५०० बालगोपाळांना संकुलाने हुरडा व हुळा पार्टीची अनोखी मेजवानी बहाल केली. गव्हाच्या भाजलेल्या ओंब्यांचा हुरडा, हरभ-याचा हुळा, ज्वारीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा खाण्याची मजा या संकुलातील विद्यार्थी सवंगड्यांसोबत शिक्षकांनीही अनुभली. त्यासोबतच या बालकांना आंबट बोरे, कवठे, चिंचा, ऊस, नारळ पाणी आदी हंगामी फळे येथेच्छ खाण्याची मेजवानीही दिली. प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी हुरडा कसा तयार करायचा याचे प्रत्यक्षात बालकांना या उपक्रमातून दाखविले. या उपक्रमात प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे, भगवानराव डांगे, शिवाजी देवढे, स्वाती धनवटे, विष्णूवर्धन, अशोक गाढवे, जालिंदर धनवटे, राजूभाऊ दिघे, गणेश शार्दुल, किशोर नवले, अरविंद पवार यांनी सहभाग घेऊन बालकांना हुरडा, हुळ्याची चव दाखवून त्याचे आरोग्यदायी महत्वही पटवून दिले. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल. येथून पुढे भावी पिढीला अशा उपक्रमातून हुरडा, हुळ्याची माहिती द्यावी लागेल, यात शंका नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर