शेवगाव : येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सैन्यदलात निवड झालेल्या तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील १९ युवकांचा भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मोनिका राजळे प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी सैन्यदलात जाणाऱ्या योगेश म्हस्के, अमोल केदार, नितीन मिसाळ, चंद्रशेखर डोळस, सोमनाथ लाड, सचिन गावडे, राहुल पवार, भीमा मार्कंडेय, सुरेश आव्हाड, सागर शेळके, अविनाश जवरे आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले, आशाताई गरड, ॲड. राहुल जामदार, नीलेश मोरे, भाजप तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, अशोक गाडे, राहुल बंब, सचिन वायकर, मच्छिंद्र बर्वे, संजय खरड, डॉ. नीरज लांडे, सूरज लांडे, सचिन वारकड, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, महेश फलके, उदय शिंदे आदी उपस्थित होते. राममंदिराची उभारणी कोणी एखादी सधन व्यक्ती करू शकली असती, तथापि या पवित्र कार्यात सर्वसामान्यांचा सहभाग असावा, या भूमिकेतून सुरू करण्यात आलेल्या राममंदिर उभारणी निधी संकलन कार्यात यथाशक्ती मदत देऊन जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन राजळे यांनी यावेळी केले. नीलेश मोरे यांनी स्वामी विवेकानंदांचे चरित्र अत्यंत ओघवत्या शैलीत मांडले. उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक तर साईनाथ पाडळे यांनी सूत्रसंचालन केले. भीमराज सागडे यांनी आभार मानले.
Web Title: Honoring those selected in the military
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.