पूरग्रस्तांसाठी नगरमधून मदतीचा ओघ : ग्रामसेवकांची ३ कोेटींची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:59 AM2019-08-12T11:59:25+5:302019-08-12T12:00:05+5:30

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़

help from the city for flood victims: 4 crore financial support | पूरग्रस्तांसाठी नगरमधून मदतीचा ओघ : ग्रामसेवकांची ३ कोेटींची आर्थिक मदत

पूरग्रस्तांसाठी नगरमधून मदतीचा ओघ : ग्रामसेवकांची ३ कोेटींची आर्थिक मदत

Next

अहमदनगर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू सोमवारी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़
पहिल्या टप्प्यातील मदत पाठविण्यात येणार असून, मदतीचे आवाहन राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे़
कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे या भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्य भावनेने मदतीचा हात दिला आहे. सुमारे तीन कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतल्याची माहिती राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली़
पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामसेवक युनियनने पत्र देऊन राज्यातील ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन देणार असल्याचे कळविले आहे़ त्यानुसार २२ हजार ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंतीही युनियनने सरकारला केली आहे. ही मदत सुमारे ३ कोटी रुपये इतकी होत आहे़ देशाप्रती व समाजाप्रती संवेदना जागृत असलेला ग्रामसेवक संवर्ग कर्तव्यापलिकडे जाऊन योगदान देत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ढाकणे म्हणाले़

गणेश मंडळांचे कार्यकर्ते धावले मदतीला
माजी नगरसेवक निखील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देऊ मदतीचा हात’ मोहीम हाती घेण्यात आली आहे़ प्रभाग क्रमांक २ मधील गणेश मंडळांनी रविवारी ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले़ तसेच मदत फेरी काढून मदत जमा केली़ यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ब्लँकेट, जर्किन, लहान मुलांचे कपडे, औषधे, बाटली बंद पाण्याचे बॉक्स, संसार उपयोगी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा केले आहेत, अशी माहिती वारे यांनी दिली़ सोमवारी निर्मलनगर येथील गाडेकर चौकांसह अन्य ठिकाणीही मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपल्याकडील वस्तू जमा कराव्यात, असे आवाहन वारे यांनी केले आहे़

शिवसेना पाठविणार ट्रकभर बाटलीबंद पाणी, औषधे
शिवसेनेच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच सेनेच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते़ चितळे रस्त्यावरील शिवालयात ही मदत जमा केली जात आहे़ सध्या पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी व औषधांची आवश्यकता आहे़ एक ट्रकभर बाटलीबंद पाण्याचे बॉक्स सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी चितळे रस्त्यावरील शिवालयात संपर्क करावा, असे आवाहन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले़

आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनतर्फे मदत केंद्र सुरू
कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली, या जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्स सर्वेअर्स असोसिएशनच्या वतीने सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे रविवारी सकाळीच मदत केंद्र उभारण्यात आले होते़ या केंद्रावर दिवसभरात एक ट्रक साहित्य जमा झाले असून, बाटलीबंद पाण्याचे बॉक्स, औषधे, कपडे, अन्नधान्य, बिस्कीटस आदी साहित्य नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी दिले आहेत़ असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, सचिव अदिनाथ दहीफळे, भूषण पांडे, अभिजित देवी, अन्वर शेख, जोएब खान, सचदेव पवार, अंकुश पालवे, प्रदीप तांदळे, प्रशांत आढाव, अशोक सातकर, मकरंद देशपांडे, अनिल मुरकुटे आदींनी नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले असून, प्रतिसाद मिळत आहे़

राष्ट्रवादी पाठविणार मदत
राष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मदत फेरी काढण्यात आली होती़ तसेच त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते़ त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत़ आमदार संग्राम जगताप मित्रमंडळाकडे बाटलीबंद पाणी, कपडे, बिस्किटचे पुड्यांचे बॉक्स, औषधे, खाद्यपदार्थ आदी ट्रकभर साहित्य जमा झाले आहे़ ते सोमवारी पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येईल. मदतकार्य सुरू राहणार असून, नागरिकांनी मदत करावी असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पूरग्रस्तांसाठी सरसावले नवनागापूरचे नागरिक
सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील प्रा. स्नेहल निर्मळ यांनी शुक्रवारी नवनागापूर भागातील जय मल्हारनगरमध्ये मदत फेरी काढली. या मदतफेरीमध्ये नागरिकांकडे तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स आदी साहित्य देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० किलो पेक्षा जास्त तांदूळ, कपडे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स दिले. या मदतकार्यामध्ये प्रणल मेहेर, तेजस्वी गाढवे, प्रा. राज सरोदे यांनी सहभाग नोंदवला. ही मदत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्याकडे देण्यात आल्याचे प्रा. निर्मळ यांनी सांगितले.

मदतीसाठी सरसावले हिंगणगाव
नगर तालुक्यातीलहिंगणगाव येथे हरिनाम सप्ताहात ह.भ.प.बबन महाराज खेडकर यांनी ग्रामस्थांना महाराष्ट्रातील सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांनबाबत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तसेच यांच्या वाणीतून पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. कीर्तन सुरू असताना महाराजांनी देखील ग्रामस्थांना मदतीची हाक दिली. या हाकेला ओ देताच दिवसभरात चार लाख रुपये किमतीचे साहित्य जमा झाले. गावातील एक टेम्पो तसेच त्यांच्याबरोबर आठ ते दहा संयोजक मंडळी प्रत्यक्षात जाऊन या वस्तूंचे वाटप करणार आहेत. मदत गोळा करण्यासाठी गावचे सरपंच आबासाहेब सोनवणे, उपसरपंच बाळासाहेब ढगे, दिलीप झावरे, मुकुंद दुबे, मनोज सोनवणे, बाळासाहेब पानसरे, वैभव ताकपेरे, जानकु शिंदे, रावा सोनवणे, जयवंत सोनवणे, बबन सोनवणे, पोपट ढगे, अर्जुन अडसूळ, शिवदास त्रिंबके, निसार पठाण, एकनाथ झावरे, अर्जुन पादीर, दत्तु सोनवणे, दादाभाऊ सोनवणे, संजय झावरे, सीताराम लोंढे, ज्ञानदेव वाघमारे, बाबा सोनवणे गुरुजी,प् ाांडुरंग सोनवणे,विश्वनाथ सोनवणे, संभाजी कोल्हे, अंजु सोनवणे, संजय शिंदे, शरद सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, बजरंग सोनवणे, चंदू पानसरे, साहिल पठाण, मदन फलके, निलेश सोनवणे याच बरोबर महिला भगिनी माजी सरपंच स्मिता सोनवणे, विद्यमान उपसरपंच आशाबाई ढगे, सुनिता मोरे, सुवर्णा दुबे, वंदना कांबळे, सरस्वती अडसूळ, मनिषा सोनवणे, छाया कांबळे, ज्योती सोनवणे, माया शेळके, जया कांडेकर यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

Web Title: help from the city for flood victims: 4 crore financial support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.