माणिकदौंडी परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:02+5:302021-09-21T04:24:02+5:30

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. माणिकादौंडी ते अहमदनगर रस्त्यावरील हरिचा तांडा जवळील ...

Heavy rain in Manikdaundi area | माणिकदौंडी परिसरात मुसळधार पाऊस

माणिकदौंडी परिसरात मुसळधार पाऊस

Next

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. माणिकादौंडी ते अहमदनगर रस्त्यावरील हरिचा तांडा जवळील पूल पाण्याखाली गेल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

माणिकदौंडी परिसरात १९६५ साली उभारण्यात आलेला आल्हनवाडी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. परिसरात रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ शकते, अशी माहिती स्थानिक रहिवासी बबन चव्हाण यांनी दिली.

आल्हनवाडी पाझर तलावाच्या भिंतीच्या बाजूस आल्हनववाडी, देवळाली, घुमटवाडी, कर्डिले वस्ती, सत्रे वस्ती, कडांनी वस्ती असा परिसर आहे. रात्री जास्त पाऊस झाल्यास या भागात पाणीच पाणी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी याच परिसरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतजमिनी उपळल्या असून शेती पिकाचे नुकसान झाले. आता सोमवारी पुन्हा जोरदार पाऊस झाला.

----

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने माणिकदौंडी ते नगर रस्त्यावरील हरिचा तांडा जवळील पाण्याखाली गेलेला पूल.

Web Title: Heavy rain in Manikdaundi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.