शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महापालिकेचा नगरमधील पाच धार्मिक स्थळांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:13 PM

रस्त्याला अडथळा ठरणारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने शनिवारी (दि. ११) मध्यरात्री हातोडा घातला. दोन मंदिरे पाडताना स्थानिकांनी त्याला विरोध केला, मात्र पाचही ठिकाणची कारवाई शांततेत पार पडली.

अहमदनगर : रस्त्याला अडथळा ठरणारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने शनिवारी (दि. ११) मध्यरात्री हातोडा घातला. दोन मंदिरे पाडताना स्थानिकांनी त्याला विरोध केला, मात्र पाचही ठिकाणची कारवाई शांततेत पार पडली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.११) रात्री सुरूवात झाली. केडगावसह बसस्थानक परिसरातील पाच मंदिरांवर हातोडा घातला.दोन ठिकाणी स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, नगररचना विभागाच्या तपासणी नंतरच कारवाई होत असल्याचे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितल्याने कारवाई फत्ते झाली.रस्त्याला अडथळा ठरणाºया १९६० नंतरच्या धार्मिक स्थळांवर मागील आठवड्यात कारवाईला सुरूवात झाली. त्यात शिवाजीनगर-कल्याण रोड, बालिकाश्रम रस्ता व सावेडी उपनगरांतील ७ मंदिरांवर कारवाई झाली. या कारवाईनंतर हिंदुत्ववादी संघटना, नगरसेवक, अनेक स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने कारवाई थंडावली होती. शनिवारी रात्री अचानकपणे महापालिकेने ही कारवाई पुन्हा सुरू केली.शनिवारी मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनपा उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, अशोक साबळे, अंबादास सोनवणे, जितेंद्र सारसर यांच्यासह पोलीस आणि महपालिका कर्मचारी यांच्या पथकाने केडगाव गाठले. केडगाव-नेप्ती रोडवरील शितळादेवी व म्हसोबा मंदिरांवर एकाच वेळी हातोडा टाकला.सोनेवाडी रस्त्यावरील शितळादेवी मंदिर हटविण्यात आले. यावेळी स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. काहीवेळ त्यांची व महापालिका कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली.पोलिसांनी हस्तक्षेप करून मंदिरातील मूर्ती ताब्यात घेतल्या व मंदिर हटविले. केडगाव देवी मंदिराजवळील लक्ष्मी माता मंदिर हटविण्यात आले. येथेही स्थानिकांनी विरोध केला. आतापर्यंत शहरातील १६ मंदिरांवर कारवाई झाली असून, आणखी ५२ मंदिरांवरही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकार