शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

१२ वर्षाखालील मूकबधिर मुले घेतली शासनाने दत्तक - गिरीष महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:17 PM

राज्यातील १२ वर्षाखालील सर्व मूकबधिर मुले दत्तक घेतली असून त्यांना शोधून त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शासन यंत्रणेबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून त्यांना महागडे उपचारही मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

ठळक मुद्दे७० हजार रुग्णांची तपासणी२२ हजार रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणीदोन ट्रक औषधांचे वाटप, सव्वा लाख जणांची भोजन व्यवस्थाअडीच हजारांहून अधिक डॉक्टर्स, पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक

अहमदनगर : राज्यातील १२ वर्षाखालील सर्व मूकबधिर मुले दत्तक घेतली असून त्यांना शोधून त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शासन यंत्रणेबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून त्यांना महागडे उपचारही मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आयोजित ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.विविध आजारांनी ग्रस्त असणा-या आणि महागड्या आरोग्यसेवा परवडत नसलेल्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार करुन घेण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील शांतीनिकेतन क्रीडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिरास प्रारंभ झाला.महाजन म्हणाले, आतापर्यंत तालुका अथवा जिल्ह्याच्या पातळीवर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रथमच राळेगणसिद्धीसारख्या ग्रामीण भागात हे शिबिर झाले. येथे मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातील. ज्यांच्यावर पुढील उपचार अथवा शस्त्रक्रिया आवश्यक आहेत, त्यांच्यावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यामुळे हे शिबिर केवळ एका दिवसापुरते नसून येथे नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल व त्यांच्यावरील सर्व उपचार मोफत करण्यात येतील. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांशी जोडले गेल्याचा अनुभव येत आहे. ग्रामीण भागात या शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच विविध संस्था-संघटना, सेवाभावी कार्यकर्ते, विद्यार्थी, शिकाऊ डॉक्टर्स परिश्रम घेत होते. आजच्या या गर्दीने त्यांच्या परिश्रमाला यश आल्याचे समाधान वाटत आहे, असे महाजन म्हणाले.

नामांकित डॉक्टरांची उपस्थिती

आयुषचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डीएमईआरचे संचालक प्रवीण शिनगारे, पद्मश्री डॉ. के.एच. संचेती, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. शेखर भोजराज, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. गौतम भन्साळी, रागिनी पारेख, महाराष्ट्र आयुर्वेद कौन्सीलचे अध्यक्ष, डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. म्हैसेकर, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.पी. बोरुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी आदींची शिबिराच्या उदघाटनप्रसंगी उपस्थिती होती. त्यांनी डॉक्टर, रुग्णांशी संवाद साधला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार