शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

ढवळपुरीत उभारणार शेळी, मेंढीपालन रिसर्च सेंटर :बाळासाहेब दोडतले

By अरुण वाघमोडे | Published: August 11, 2019 3:48 PM

बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार

अरुण वाघमोडेअहमदनगर : बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़दोडतले म्हणाले, पहिल्या टप्यात राज्यात पाच रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे़ सुरुवात ढवळपुरी येथील सेंटरपासून करणार आहे़ याबाबत राज्याच्या पशुसंवर्धन खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे़ येत्या पंधरा दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल़ या सेंटरसाठी ढवळपुरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी ५० एकर जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे हे सेंटर उभारणीत काहीच अडचणी येणार नाहीत़ या सेंटरच्या माध्यमातून शेळी-मेंढीच्या नवीन जातींची पैदास, बंदिस्त शेळी-मेंढीपालनासाठीचे संशोधन, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, बाजारपेठ, व्यवसाय उभारणीत मदत, शासकीय योजनांची माहिती, शेळी-मेंढी पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ या माध्यमातून शेतकºयांना उद्योजक म्हणून उभा करणे हा उद्देश आहे़ असे सांगत दोडतले म्हणाले, सध्या राज्यात मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० कोटींच्या योजना राबविण्यात येत आहेत़ राज्य शासनाकडे आणखी १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे़दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून हा निधी लवकरच उपलब्ध होईल़ केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्यामार्फतही २०० कोटी रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत़मेंढपाळांसाठी संरक्षण किटशेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाºया कुटुंबाना मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून एक संरक्षक किट देण्यात येणार आहे़ यामध्ये सौरऊर्जेवर चालणारी बॅटरी, सौरचूल व एक तंबू देण्यात येणार असल्याचे दोडतले यांनी सांगितले़मेंढपाळांच्या मुलांसाठी वसतिगृहमहाराष्ट्रात मेंढपाळांची मोठी संख्या आहे़ त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशातून महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्णात वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे़ धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ त्या माध्यमातून येणाºया काळात या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे दोडतले म्हणाले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय