कु-हाडीने घाव घालून पत्नीसह मुलीचा खून; कोपरगाव दुहेरी हत्याकांडाने हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:37 AM2018-03-06T10:37:33+5:302018-03-06T10:53:20+5:30

कोपरगाव येथील खडकी भागात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली़ दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

Girl's wife murdered with bone and bones; Kopargaon shook with a double murder | कु-हाडीने घाव घालून पत्नीसह मुलीचा खून; कोपरगाव दुहेरी हत्याकांडाने हादरले

कु-हाडीने घाव घालून पत्नीसह मुलीचा खून; कोपरगाव दुहेरी हत्याकांडाने हादरले

Next
ठळक मुद्देरंगपंचमीच्या दिवशी सकाळीच कोपरगावात दुहेरी हत्याकांडआरोपी गणेश भीमराव खरात स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.सुकेशनी ऊर्फ गौरी गणेश खरात व दिदी गणेश खरात (वय ३वर्ष) अशी मयताची नावे आहेत.

कोपरगाव : कोपरगाव येथील खडकी भागात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
गणेश भीमराव खरात हा पत्नी सुकेशनी उर्फ गौरी, तीन वर्षाची मुलगी दिदी, दोन मुले यांच्यासह राहत होता. गणेशची सासू रुख्मिणी सुभाष गवई (वय ६०, रा. कोल्हारा, ता. चिखली, जि. बुलढाणा) या लेकीला माहेरी नेण्यासाठी सोमवारी (दि. ५) कोपरगावात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी (दि.६) सकाळी सासू व जावयात भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी पत्नी गेल्या असता गणेशला राग अनावर झाल्यामुळे त्याने कु-हाडीने घाव घातल्याचे सांगण्यात येत आहे. गणेश खरात याने पत्नी गौरी व मुलगी दिदी यांच्या डोक्यात कु-हाडीने घाव घालून त्यांना ठार केले. तर वयोवृद्ध गंभीर जखमी झाली आहे. या कृत्यानंतर आरोपी गणेश खरात हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील नागरिकांचीही आरोपीच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी सकाळीच मन सुन्न करणारी ही घटना घडली. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Girl's wife murdered with bone and bones; Kopargaon shook with a double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.