शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

समाजवादाचा संसार फुलविणारे गवारे मामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 5:17 PM

स्वातंत्र्य, समता, लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद व बंधुभाव या मूल्यांवर गवारे मामांची नितांत श्रद्धा़ समाजवादासाठी पायाला भिंगरी लाऊन ते भारतभर फिरले. समाजवादाची गीते गायिली. आंतरराष्ट्रीयस्तरावर कोलंबो येथेही त्यांनी समाजवादाचेच गीत गायले. स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष झाले तरी त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजवादाचा संसार फुलविण्याला पहिले प्राधान्य दिले.

अहमदनगर : महात्मा गांधींनी १९४२ साली चले जावची घोषणा केली आणि देशातील तरुणांनी स्वातंत्र्यासाठी जीवन झोकून देण्याची लाटच निर्माण झाली. या लाटेत ज्यांना स्वार व्हायला मिळाले, ते धन्य. अनेकांनी आपल्या घरादाराची पर्वा न करता आंदोलनात उडी घेतली. समाजवादाचा पुरस्कार करीत काहींनी आपले जीवनच राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून देशासाठी समर्पित केले़ त्यामध्ये गंगाधर मुक्ताजी गवारे (सर्वांचे गवारे मामा) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.गवारे मामा यांचा जन्म ७ आॅगस्ट १९१७ चा़ बालपण तसे कष्टातच गेले. आईने खंबीर आधार दिला. त्यामुळे त्यांचे त्या काळात व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे आताची ७ वी पर्यंतचे शिक्षण होेऊ शकले़ जीवनात ध्येय घेऊन काम करण्याची खूणगाठ बांधूनच त्यांची वाटचाल सुरु होती. कोपरगाव व नांदगाव येथे त्यांनी काही दिवस दुकानात काम केले. पण त्यांचे मन रमेना. स्वातंत्र्य आंदोलनाचा लढा जोरात सुरु होता. स्वातंत्र्य लढ्यातील वेगवेगळ्या प्रेरणादायी कहाण्या त्यांच्या कानावर पडत. पाठीला पोट बांधून देशासाठी प्राणाची पर्वा न करणारे कार्यकर्ते त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊ लागले. हळूहळू त्याच कार्यकर्त्यांना ते आदर्श मानू लागले. त्यांची कार्यपद्धती, जीवननिष्ठा, विचार करण्याची शैली देशप्रेमाने भारुन गेली. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव निर्माण झाला. महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा व  शांती या तत्वाकडे गवारे मामा आकर्षित झाले. महात्मा गांधींच्या चले जाव चळवळीसाठी कोपरगाव तालुक्यातील पहिला सत्याग्रही म्हणून जो तरुण पुढे आला, तेच हे गंगाधर गवारे मामा. घरावर तुळसीपत्र ठेऊन गवारे मामांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. निरोप पोहोचविणे, तारा तोडणे, सायक्लो स्टाईल पत्रके वाटणे, मोर्चे व मिरवणुका काढणे, सत्याग्रहींच्या तुकड्या संघटित करणे, अशा स्वातंत्र्य चळवळीच्या कामाला गवारे मामांनी वाहून घेतले. आपल्या शाहिरी आवाजाने जेथे सभा असेल तेथे स्वातंत्र्याच्या स्फूर्तीगीतांचे ते गायन करीत. भाषणांमधूनही कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करीत.१९२३ साली डॉ. ना. सु. हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्तानी सेवा दल तयार करण्यात आले. १९३१ साली त्याचे रुपांतर काँग्रेस सेवा दलात करण्यात आले. परंतु काही जातीयवादी संघटना जोर धरू लागल्याने सेवादलाच्या पुनर्गठणाची गरज महाराष्ट्र काँग्रेस समितीला वाटू लागली. त्यानुसार ४ जून १९४१ साली राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली. गवारे मामा राष्ट्र सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. सेवा दलाच्या शाखा भरविणे, मिरवणुका काढणे, स्फूर्ती गीते म्हणणे यावर त्यांचा भर होता. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांना दोन वेळा तुरुंगवासाची शिक्षा झाली़ नाशिक जेलमध्ये इंग्रजांनी त्यांना बंदिवान केले होते.पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर राष्ट्र सेवा दलाची उद्दिष्टे बदलली. महात्मा गांधींच्या विचारांप्रमाणे स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने काम हाती घेतले. त्यात नवसमाज व नवसंस्कृती रचनेचे काम सुरु झाले. स्वातंत्र्य चळवळीत गवारे मामांना राष्ट्रीय नेत्यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून समताधिष्ठीत राष्ट्र निर्माण  करण्यासाठी गवारे मामांनी कार्य हाती घेतले. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा होता़ त्यामुळे त्यांना कधी नेता होण्याची लालसा नव्हता. भारतापुढे ज्या पुनर्रचनेच्या आणि परिवर्तनाच्या राजकीय व सामाजिक समस्या होत्या, त्या समस्याचे स्वरूप नीट समजावून घेऊन निष्ठापूर्वक काम करणा-या डोळस, निष्ठावान, त्यागी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी गवारे मामांनी अहमदनगर जिल्ह्यात रचनात्मक काम सुरु केले. नगर जिल्हा हा त्या काळी दुष्काळाने व्यापला होता. यामध्ये संगमनेर, अकोले परिसर हा द-याखो-यांनी वेढलेला होता. अनेक गावांना रस्ते नव्हते. राष्ट्र सेवा दलांतर्गत साने गुरुजी पथकाची स्थापना झाली होती. या पथकाद्वारे त्यांनी संगमनेरचे स्वर्गीय दुर्वे नाना व अकोल्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागाने व श्रमदानातून अनेक रस्ते तयार केले. पाणी पुरवठ्यांसाठी बंधारे, तलाव, विहिरींची निर्मिती केली. राजूर- शेणीत रस्ता व पेमगिरी-निमगाव पागा हा रस्ता कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून तयार केला.आयुष्यभर समाजवादी चळवळ वाढविताना आपल्या वैयक्त्तिक आयुष्याकडे त्यांनी वळूनही पाहिले नाही. समाजवादी, पुरोगामी विचार व त्यायोगे समाज परिवर्तन हेच त्यांनी जीवनाचे ध्येय मानले होते. त्यानुसार ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. गवारे मामांचे वैशिष्ट्य असे की, स्वत:चा संसार न करता त्यांनी समाजाचा संसार केला. ते शेवटपर्यंत सेवा दलाच्या कार्यालयात राहिले. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणा-या पेन्शनशिवाय त्यांनी शासनाची कोणतीही सवलत घेतली नाही. साने गुरुजी, स्वामी सहजानंद भारती, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, पंडित नेहरू, सरदार पटेल असे अनेक नेते त्यांचे आदर्श होते. समाज परिवर्तन चळवळीसाठी शिस्तबद्ध, योग्य संस्कार झालेला, शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ झालेला कार्यकर्ता तयार करुन सेवादलाचे कार्य  व विचार त्यांनी घराघरात पोहोचवले. ते सर्वांचे मामा होते़ गावोगाव ते गेले की कार्यकर्ते त्यांचे प्रेमाने स्वागत करीत असत.शाहिरी आवाज असल्याने सेवा दलाच्या कलापथकात गवारे मामा यांनी निळू फुले, राम नगरकर, सुधाताई वर्दे, प्रा. वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे यासारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले. गवारे मामांचा स्वभाव अत्यंत मायाळू व सर्वांना समजून घेऊन पुढे जाणारा होता. धार्मिक वृत्ती जरी असली तरी ती स्वत:पुरती होती. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद व बंधुभाव या मूल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. म्हणूनच ते पायाला भिंगरी लाऊन भारतभर फिरले. त्याचबरोबर १९६३ साली त्यांना आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक सभेच्या वतीने सिलोन देशातील कोलंबो येथे समाजवादी परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्याबरोबर माजी खासदार बापूसाहेब काळदाते, मुंबईच्या सुधाताई वर्दे, ठाण्याचे भाऊ कदम, मुंबईचे शाहीर लीलाधर हेगडे यांचा समावेश होता.गवारे मामांनी राष्ट्र सेवा दलाबरोबर विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता. हजारो एकर जमीन जमा करून ती सर्व अल्प भूधारकांना वाटण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. सर्वोदय, सानेगुरुजी सेवा पथक, स्वातंत्र्य सैनिक संघटना व विविध सामाजिक संस्थांचे त्यांनी संघटन केले व या संस्था वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपले ध्येयवादी निगर्वी व सतत विधायक दृष्टिकोन बाळगण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी कायम स्नेहभाव राहिला. त्यामुळेच स्व. शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेत त्यांना सन्मानाने काम करण्यासाठी जनरल बॉडीचे सदस्य केले. त्या माध्यमातून गवारे मामांनी कोपरगाव येथील सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय, कन्या विद्या मंदिर व के.बी.पी. विद्यालयासह तालुक्यातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला़ नवनिर्माणाच्या नावाखाली अनेक कामे करताना नीतीमूल्यांचे अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत यावर अंकुश ठेवणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, ही त्यांची कायम अपेक्षा होती. सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले जावे. सर्व योजनांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचावेत, असे त्यांना वाटत असे. उद्या विज्ञानाच्या रूपाने उभी राहणारी आव्हाने पेलण्याची क्षमता असणारी युवा पिढी तयार व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे, असा त्यांचा आग्रह होता. डॉ. राममनोहर लोहिया यांनी समाजवादी कार्यकर्त्यांना तुरुंग, फावडं आणि मतपेटी हा संदेश दिला होता. अन्यायाच्या विरोधात तुरुंगात गेले पाहिजे, सामाजिक परिवर्तन मतपेटीच्या माध्यमातून घडविले पाहिजे आणि राष्ट्र उभारणी रचनात्मक कार्यातून व्हायला हवी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार गवारे मामांनी १९५७ ची कोपरगाव विधानसभेची निवडणूक लढविली. आपल्या सहकारी कार्यकर्त्यासह तालुका पिंजून काढला़ पण त्यांना अपयश आले. त्यानंतर मामांनी राजकारण केले नाही. राजकारणात ते कोणाचे झेलकरीही बनले नाहीत.भारताला इतिहास काळातल्या काल्पनिक वैभवाच्या स्वप्नात गुंतवून ठेवणा-या, अंधश्रद्धा जतन करून ठेवणा-या आणि इथल्या जनतेत जातीच्या अथवा धर्माच्या नावाखाली जहर पसरविणा-या संघटनांवर मात करून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिले़ त्याद्वारे समतेवर व बंधुभावावर उभा असलेला समाजवादी भारत संविधानात मांडलेला. मात्र, हा समाजवादी भारत प्रत्यक्षात उभा करण्यासाठी युवा शक्तीला त्यादृष्टीने तयार केले पाहिजे, घडविले पाहिजे, असा गवारे मामांचा नेहमी आग्रह होता. गवारे मामा २००० साली आपल्यातून गेले़ मात्र, त्यांच्या समाजवादी विचारांचा वारसा आपल्यासाठी कायमस्वरुपी ठेऊन गेले. गवारे मामांच्या विचारानुसार समाजवादी भारतासाठी पुन्हा तरुणांकडेच वळण्याची गरज आहे. 

परिचयजन्म : ७ आॅगस्ट १९१७गाव : कोपरगावशिक्षण : पूर्वीचे व्हर्नाक्युलर फायनल (सध्याची ७ वी) मृत्यू : २४ आक्टोबर २०००

भूषविलेली पदे - स्वातंत्र्य आंदोलन सहभाग : १९३० ते १९४७ ; ३ वर्ष कारावास- १९४२ ते १९९९ : राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ सेवक- १९५७ : कोपरगाव विधानसभा लढविली - विश्वस्त : १९९५ पर्यंत मराठा पंच मंडळ, कोपरगाव - ४० वर्ष राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य : अखिल भारतीय राष्ट्र    सेवा दल- ६ वर्ष कार्याध्यक्ष : अहमदनगर राष्ट्र सेवा दल- आजीव सदस्य : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे- अध्यक्ष : स्वातंत्र्य सैनिक संघटना कोपरगाव तालुका- जनरल बॉडी सदस्य : रयत शिक्षण संस्था, सातारा- सदस्य : शालेय स्कूल कमेटी, कन्या विद्या मंदिर- सदस्य : व्यवस्थापन समिती, गंगागिरी महाराज महाविद्यालय- सदस्य : शांतता समिती, कोपरगाव पोलीस ठाणे

लेखक - पुरुषोत्तम पगारे  (राष्टÑपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय