नवनागापूरला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:33+5:302021-03-01T04:25:33+5:30

नवनागापूर : नवनागापूर ग्रामपंचायतीसाठी होणारा पाणीपुरवठा देहरे येथील नवीन पंपिंग स्टेशनचे काम सुरू असल्यामुळे विस्कळीत झाला होता. मात्र, आता ...

Full pressure water supply to Navnagapur soon | नवनागापूरला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा

नवनागापूरला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा

googlenewsNext

नवनागापूर : नवनागापूर ग्रामपंचायतीसाठी होणारा पाणीपुरवठा देहरे येथील नवीन पंपिंग स्टेशनचे काम सुरू असल्यामुळे विस्कळीत झाला होता. मात्र, आता हे काम पूर्ण झाले असून, नव्याने वाढीव आठ लाख लिटर पाणी प्रतिदिनी मंजूर झाले आहे. त्यामुळे नवनागापूर ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी दिली.

नवनागापूर ग्रामपंचायतीला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी (दि.२६) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच डॉ. डोंगरे म्हणाले, आता ग्रामपंचायतीला प्रतिदिनी दहा लाख लिटर पाणी मिळत आहे. त्यातील ग्रामपंचायतमार्फत वितरित होणाऱ्या योजनेसाठी सात लाख लिटर पाणी वापरात येणार आहे. उर्वरित तीन लाख लिटर पाणी चेतना कॉलनी व परिसरासाठी देण्यात येणार आहे. चेतना कॉलनी व परिसरात सध्या ग्रामीण पाणीपुरवठा समितीमार्फत पाणीपुरवठा होतो. चेतना कॉलनी व परिसरासाठी सात लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून, तेथील पाणीपुरवठाही आता सुरळीत होणार आहे, असे डोंगरे म्हणाले.

ग्रामपंचायतीची बैठक झाल्यानंतर सरपंच डोंगरे यांच्यासह माजी सरपंच दत्तापाटील सप्रे, सदस्य सागर सप्रे, गोरक्षनाथ गव्हाणे यांनी पाहणी केली.

..............

चेतना कॉलनीला वाढीव तीन लाख लिटर पाणी

ग्रामपंचायतीकडून चेतना कॉलनी व परिसरासाठी तीन लाख लिटर पाणी देण्यात येणार आहे. चेतना कॉलनी परिसरात चार पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असून, दोन महिन्यांत हे पूर्ण काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे सरपंच बबनराव डोंगरे यांनी सांगितले.

........

२८ नवनागापूर

देहरे येथील पंपिंग स्टेशनची पाहणी करताना सरपंच डॉ. बबनराव डाेंगरे. समवेत माजी सरपंच दत्तापाटील सप्रे, ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे, गोरक्षनाथ गव्हाणे.

Web Title: Full pressure water supply to Navnagapur soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.