Free for protection from corona | कोरोनापासून संरक्षणासाठी मोफत

कोरोनापासून संरक्षणासाठी मोफत

अहमदनगर : कोरोनामुळे सर्व वयोगटातील व्यक्ती त्रस्त आहेत. या आजाराची लाट वेगाने सगळीकडे पसरत आहे. अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. स्मशानभूमीमध्ये जागा पुरत नाही. अत्यंत बिकट, भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अनेक मने धास्तावलेली आहेत. त्यामुळे मानसिक इम्युनिटी वाढविण्यासाठी नऊसूत्री हिलिंगच्या सुविधा ज्या ऑनलाइन आणि मोफत आहेत या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती राजयोगा हिलर ग्रुपच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

प्रत्येकाने इम्युनिटी पॉवर वाढविण्याची गरज आहे. लसीकरणाने इम्युनिटी पॉवर वाढते, त्यासोबतच मानसिक इम्युनिटी पॉवर वाढविण्याची गरज आहे. मनातील भीती, काळजी, चिंता, दु:ख यामुळे मानसिक रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यामुळे रोग अधिक पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच नऊसूत्री हिलिंगची गरज निर्माण झाली आहे. नऊसूत्री हिलिंगमध्ये राजयोगा मेडिटेशन, सेल्फ हिलिंग, कौन्सिलिंग, डिस्टन्स हिलिंग, हिलिंग फुड, हिलिंग वॉटर, हिलिंग व्यायाम, शांत झोप येण्यासाठी स्लिप मॅनेजमेंट, कोरोना आजाराविषयी शास्त्रशुद्ध माहिती या विषयीचे मार्गदर्शन ऑनलाइन मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे डॉ. सुधा कांकरिया यांनी सांगितले. (वा.प्र.)

Web Title: Free for protection from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.