शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नगर जिल्हा विभाजनावरुन विखे, ढाकणे यांच्यात संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:38 PM

दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला.

पाथर्डी : युवा नेते डॉ.सुजय विखे व प्रताप ढाकणे यांच्यात जिल्हा विभाजनावरून संघर्षाची ठिणगी पडली असून दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. व दक्षिणेतील सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा विभाजनावर एकत्र येण्याचे आवाहनही ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.विखेंवर टीका करतांना ढाकणे म्हणाले, आजपर्यत दक्षिणेचा विकास निघी उत्तरेकडील लोकांनी पळविला. तुमच्याकडे सत्ता, संपत्ती आहे. आम्ही अर्र्धपोटी असलो तरी अन्याय सहन करणार नाही. आम्ही न्याय घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्ही मोठे होतांना आम्हाला लहान करू नका. जिल्हा विभाजन झालेच पाहीजे. झाले तर आताच होईल. कारण पालकमंत्री दक्षिणेचे आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात तुम्हाला दक्षिणेचे प्रेम उफाळून आले. जिल्हा परीषदेचा निधी ठराव गटांनाच दिला जातो याचा आम्ही जाब विचारणार आहोत.नैसर्गिकदृष्ट्या आम्ही दुष्काळी असलो तरी बौघ्दीक दूष्टया सक्षम आहोत. राजकारणाच्या स्वार्थासाठी तुम्ही काय चालवलय. नगर जिल्हयात आदराला आदर तर ठोशाला ठोसा ही भावना सर्वाच्या मनात आहे. याबाबत मी स्पष्टपणे बोललो आहे. दक्षिणेत यायचे, भांडणे लावून स्वार्थ साधायचा. चांगल्या कार्यकर्त्याना नादी लावायचे हे तुमचे उदयोग. पाथर्डी पालीका निवडणूकीत कारण नसतांना वाद लावून निघून गेले. ही कुठली मस्ती. सत्ता व संपत्तीचे प्रदर्शन दक्षिण भाग सहन करणार नाही. जिल्हा विभाजनामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळणार असून आमचा निधी आमच्या भागात खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहीजे, याचा पुनरुच्चार ढाकणे यांनी केला.यावेळी नगरसेवक बंडू पा.बोरूडे, सीताराम बोरूडे, अमोल बडे, योगेश रासने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPathardiपाथर्डी