नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधकामुळे चार वाहनांचा अपघात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 04:48 PM2019-12-15T16:48:36+5:302019-12-15T16:49:09+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले.

Four-vehicle accident on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधकामुळे चार वाहनांचा अपघात  

नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधकामुळे चार वाहनांचा अपघात  

Next

   घारगाव : संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
नाशिकहून पुण्याकडे जाणारा ट्रक (जी.जे.-०७, वाय.झेड.- १७३८) घेवून निघालेल्या चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक गतिरोधकावर आदळून पुढे चाललेल्या ट्रकला (क्रमांक जी. जे. ०५,  बी.के.७७३१) पाठीमागून धडकला. त्याचवेळी पुढे चाललेल्या कारला (एम.एच.-१७, बी.एस.-०६८९) मागून धडक बसल्याने कार फिरून महामार्गाच्या लगत असलेल्या मालवाहू जीपला (जी.जे.०६,  ए.झेड.- ९०३७) धडकली. जीप उपरस्त्यावर जाऊन पलटी झाली.

Web Title: Four-vehicle accident on Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.