शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

अन्न सुरक्षा योजना घोटाळा : नेवासेत द्वितीय वर्षश्राद्ध घालून अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 2:32 PM

नेवासा तालुका कृषी कार्यालयात २०१५-१६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस दोन वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी पूर्ण झाली नाही.

नेवासा : नेवासा तालुका कृषी कार्यालयात २०१५-१६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या घोटाळ्याच्या चौकशीस दोन वर्ष पूर्ण होऊन ही चौकशी पूर्ण झाली नाही. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या कार्यालयासमोर दीपक धनगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या चौकशीच्या आदेशाचे विधिवत पूजा करून द्वितीय वर्ष श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.विभागीय कृषी सहसंचालक यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी चौकशी अधिकारी यांना दिलेल्या आदेशाला २३ जानेवारी १९ रोजी दोन वर्षे पुर्ण होवुनही अद्याप तालुक्यातील अन्न सुरक्षा' भ्रष्टाचारप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही. आॅक्टोबर महिन्यात पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयाच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न दिपक धनगे यांनी केला होता. यावेळी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांच्याशी चर्चा करून लेखापरिक्षण करण्याचे लेखी आश्वासन देवून १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिले होते. त्यानंतर लेखापरिक्षणासाठी चार व्यक्तीचे पथक तयार केले.हे पथक विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आले होते. या पथकाने लेखापरीक्षण करून तीन महीने होत आले पण पुढे काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यातच असल्याचे धनगे म्हणाले.    वेळोवेळी उपोषण, आंदोलने व आत्मदहन करूनही चौकशी पूर्ण न केल्याने चौकशी अधिका-यांसह कृषि अधिकारी सुधीर शिंदे व दोंषीवर निलंबनाची कारवाही करुन व अपहाराची रक्कम वसूल करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन चौकशी अधिकारी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी नागेशजी आघाव, बाळासाहेब लिंगायत, संभाजी माळवदे, भाऊसाहेब वाघ, अभिजित मापारी, पोपट जिरे, सोपान रावडे, गोरक्षनाथ साळुंके, गणेश चौघुले, पोपटराव वाकचौरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर