अहमदनगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना, संगमनेरात दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:00 AM2020-05-30T11:00:07+5:302020-05-30T11:00:16+5:30

अहमदनगर-नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे राहत आहे.

Five members of the same family in Ahmednagar city were found positive in Corona, Sangamnera | अहमदनगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना, संगमनेरात दोन पॉझिटिव्ह

अहमदनगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना, संगमनेरात दोन पॉझिटिव्ह

Next

अहमदनगर-नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे राहत आहे.
याशिवाय संगमनेर तालुक्यातही दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील भारत् नगर आणि मोेमीनपुरा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी सात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे नगर शहरात चिंता वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाºयांची संख्या वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

Web Title: Five members of the same family in Ahmednagar city were found positive in Corona, Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.