Fire breaks out in Sonai shop | सोनईतील दुकानाला भीषण आग

सोनईतील दुकानाला भीषण आग

सोनई : सोनई येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मनोज जनरल स्टोअरला भीषण आग लागली. या आगीत दुकान खाक झाले आहे.

दुकानाची आग विजविण्यासाठी मुळा कारखाना, भेंडा कारखाना, राहुरी व शनैश्वर देवस्थानचे अग्नीशामक दल आग विजविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दुकाने अनेक दिवसांपासून बंद आहे. या दुकानाशेजारी कापड, दागिणे, किराणा, कृषी सेवा, इलेक्ट्रानिक दुकाने आहेत. इतर दुकांनाना आगीचा धोका पोहचु नये म्हणुन प्रशासन उपाय करत आहे.

सकाळी आठ वाजण्याचा सुमारास आग लागल्याचे कळताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दुकानात शालेय पुस्तके, वह्या, साहित्य होते. ते जळुन गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे मनोज जनरल स्टोअर्सचे संचालक मनोज चंगेडिया यांनी सांगितले.

Web Title: Fire breaks out in Sonai shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.