शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

अखेर विकास वाघ यांची 'कोतवाली'तून बदली,प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे पदभार, निरीक्षक भोये शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 3:19 PM

अहमदनगर: विविध कारणामुळे चर्चेत राहिलेले  कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची अखेर  आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर: विविध कारणामुळे चर्चेत राहिलेले  कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची अखेर  आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी रविवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वाघ यांची प्रशासकीय बदली करण्यात आले असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान विकास वाघ यांनी स्वतःवर गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मागील महिन्यात जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. याबाबत पोलीस उपाधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून पोलीस अधीक्षकांना अहवालही सादर केला आहे. अखेर वाघ यांची कोतवाली सारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत रवानगी करण्यात आली आहे.