स्थायी सभापतींच्या निवडीला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:30+5:302021-02-24T04:23:30+5:30

अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी जाहीर केला असून, सभापती ...

The final moment for the election of permanent speakers | स्थायी सभापतींच्या निवडीला अखेर मुहूर्त

स्थायी सभापतींच्या निवडीला अखेर मुहूर्त

Next

अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी जाहीर केला असून, सभापती पदासाठी येत्या ४ मार्च रोजी मतदान होणार आहे. सभापती पदासाठी रष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात अर्ज दाखल होतो की घुले बिनविरोध सभापती होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला होता. त्यास विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीने सभापती पदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून घुले यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. स्थायी समितीत सेनेचे पाच, तर भाजपाचे चार सदस्य आहेत. परंतु, सेनेकडून सभापती पदासाठी एकही सदस्य इच्छुक नाही. भाजपातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भाजपकडूनही सदस्यांना कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे सदस्यांनीही राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळला असून, ऐनवेळी पक्षाकडून आदेश आल्यास भाजपकडून अर्ज दाखल केला जाऊ शकतो. सेनेनेही या निवडणुकीतून अंग काढून घेतले आहे. सेनेचे पाच सदस्य आहेत. परंतु, त्यांनाही पक्षाकडून आदेश नाही. मागील सभापती निवडणुकीच्यावेळी सेनेच्या योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ऐनवेळी माघार घेतल्याने मनोज कोतकर हे सभापती झाले. यावेळी मात्र सेनेत शांतता असल्याने ऐनवेळी सेना काय भूमिका घेते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

...

महापालिकेतील सेनेचा विरोध मावळला

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र सेना व राष्ट्रवादीचा सूर जुळलेला नाही. मागील सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात सेनेने भूमिका घेतली होती. यावेळी मात्र सभापती पदाच्या निवडणुकीपासून सेना अलिप्त आहे. त्यामुळे सेनेचा महापालिकेतील विरोध मावळला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: The final moment for the election of permanent speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.