चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करणारा महोत्सव :डॉ. बापू चंदनशिवे

By नवनाथ कराडे | Published: February 14, 2019 06:41 PM2019-02-14T18:41:01+5:302019-02-14T18:50:40+5:30

न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाने २००८ मध्ये पहिला लघुपट व माहितीपट सुरु केला. सुरुवातीला थंडा प्रतिसाद असलेल्या या महोत्सवाला आज मोठी पसंती मिळत आहे.

Film Festival that produces a lovely movie: Dr. Bapu Chandan Shiva | चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करणारा महोत्सव :डॉ. बापू चंदनशिवे

चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करणारा महोत्सव :डॉ. बापू चंदनशिवे

Next
ठळक मुद्दे१२ वा प्रतिबिंब लघुपट व माहितीपट महोत्सव

नवनाथ खराडे
अहमदनगर : न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाने २००८ मध्ये पहिला लघुपट व माहितीपट सुरु केला. सुरुवातीला थंडा प्रतिसाद असलेल्या या महोत्सवाला आज मोठी पसंती मिळत आहे. नगरमध्ये चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करण्यात या महोत्सवाचा मोलाचा वाटा आहे. या महोत्सवाला सुरुवात होऊन तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्यापासून १२ व्या प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सव सुरु होत आहे. त्यानिमित्ताने संज्ञापन अभ्यास विभागाचे विभागप्रमुख डॉ. बापू चंदनशिवे यांच्याशी  मारलेल्या गप्पा...
( व्हिडिओ पाहण्यासाठी Lokmat Ahmednagar या फेसबुक पेजला भेट द्या)

प्रश्न : महोत्सवाला सुरुवात कधी आणि कशी झाली ?
डॉ. चंदनशिवे : २००७ साली न्यू आर्टस महाविद्यालयात संज्ञापन अभ्यास विभाग सुरु झाला. संज्ञापन अभ्यास विभाग चित्रपट निमिर्ती आणि मिडिया क्षेत्रात जाण्यासाठीचे शिक्षण दिले जाते. पहिल्या वर्षी या क्षेत्रातील जाणकारांची एकदिवसीय कार्यशाळा झाली. दुस-या दिवशी म्हणजे २५ जानेवारी २००८ ला पहिला प्रतिबिंब लघुपट महोत्सव झाला. तत्कालीन विभागप्रमुख प्रा. मिथुनचंद्र चौधरी यांनी त्यास प्रतिबिंब असे नाव दिले. आशा थिएटरला काही प्रायोजक घेऊन हा महोत्सव पार पडला. पहिल्या महोत्सवात नागराज मंजुळे यांचा ‘पायांना वाटा नसतात’ हा लघुपट पहिला आला. उद्या हा महोत्सव १२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

प्रश्न : पहिल्या वर्षी महोत्सवाला प्रतिसाद कसा होता ?
डॉ. चंदनशिवे : पहिल्या वर्षी फक्त लघुपट महोत्सव होता. १०० पेक्षा कमी प्रेक्षक होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघुपट कसे पाहायचे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. लघुपट व माहितीपटाची संकल्पना नगरमध्ये तितकिशी रुजलेली नव्हती. त्यामुळे प्रतिसाद खूपच कमी होता. जाणकार प्रेक्षकच सहभगी झाले होते. हा प्रतिसाद वाढला आहे.

( व्हिडिओ पाहण्यासाठी Lokmat Ahmednagar या फेसबुक पेजला भेट द्या)

प्रश्न : महोेत्सवाचे स्वरूप कसे आहे ?
डॉ. चंदनशिवे : दरवर्षी १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित केला जातो. सुरुवातीला आम्ही फक्त लघुपटांची स्पर्धा घ्यायचो. तो नगरकरांसाठी खुला नव्हता. त्यानंतर आम्ही तीन दिवस महोत्वस सुरु करून नगरकरांसाठी खुला केला. पहिले दोन दिवस जगातील, भारतातील कलात्मक चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर कालाधवी चार दिवसांचा केला आहे. आता विद्यार्थी आणि खुल्या गटामध्ये लघुपट आणि माहितीपटाची स्पर्धा आपण घेतो. पहिल्या तीन क्रमांकाना आपण बक्षीसे देतो.

प्रश्न : कलात्मक चित्रपटाला प्रेक्षक कमी लाभतात, याबद्दल काय सांगाल ?
डॉ. चंदनशिवे : अ‍ॅक्शन, ड्रामा असे चित्रपट असतील या महोत्सवात पाहायला मिळतील असे प्रेक्षकांना वाटायचे. मात्र आम्ही कलात्मक सिनेमे दाखवतो. आम्ही चित्रपट संपल्यानंतर त्यावर चर्चा करतो. सुरुवातीला निम्मे प्रेक्षक निघून जायचे. ज्यांना केवळ आवड आहे, ते प्रेक्षक चर्चेत सहभागी व्हायचे. चर्चा करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर प्रेक्षकांनाही शिस्त लागली. मन लावून प्रेक्षक चित्रपट पाहू लागले. आता मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपट पाहात आहेत. मनातील प्रश्न विचारतात. त्यालाही उत्तरे दिली जातात. चर्चात्मक पध्दतीने महोत्सवात चित्रपट पाहिले जातात. त्यामुळे महोत्सवाच्या माध्यमातून कलात्मक सिनेमे पाहण्याची आवड प्रेक्षकांना जडली आहे.

( व्हिडिओ पाहण्यासाठी Lokmat Ahmednagar या फेसबुक पेजला भेट द्या)

प्रश्न : फेस्टिवलचे वैशिष्ट्ये काय ?
डॉ. चंदनशिवे : अनेक शहरामध्ये अशा प्रकारचे विभाग सुरु करण्यात आले. मात्र नगरमधील विभागाने आपले वेगळेपण टिकून ठेवले आहे. कथा, पटकथा, एडिटींग आम्ही शिकवतो. नागराज मंजुळे यांच्या ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात हा विभाग नावारुपाला आला. २०१४ मध्ये ‘फॅन्ड्री’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर हा विभाग देशात पोहोचला. त्यानंतर सैराट आला. भाऊराव क-हाडे यांचा ख्वाडालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांचाच ‘बबन’ आला. महेश काळे याचाही ‘घुमा’ आला. विभागाला वलय प्राप्त झाले. आणखी खूप विद्यार्थी मिडियामध्ये काम करत आहेत. अनेक विद्यार्थी चित्रपट बनवत आहेत.

प्रश्न : महोत्सवाचे नियोजन कसे केले जाते ?
डॉ. चंदनशिवे : महाविद्यालयाच्या परिसरातील राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये महोत्सव आयोजित केला जातो. त्यामुळे विद्यार्थी प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सभागृहाची आसनक्षमता ६०० आहे. सभागृह पूर्णपणे भरते. अनेकवेळा मधल्या मोकळ््या जागेतही प्रेक्षक बसतात. विभागाचे विद्यार्थी सर्व नियोजन करतात. सर्व शो हाऊसफुल होतात. कलात्मक सिनेमे असल्यामुळे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे सिनेमा कसा पाहावा, काय पाहावे त्याच्यामधून काय घ्यावे, असे शिकायला मिळते. गेल्या ११ वर्षात नगरमध्ये या महोत्सवाच्या माध्यमातून नगरमध्ये चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार झाले आहे.

प्रश्न : यंदाच्या महोत्सवात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहेत  ?
डॉ. चंदनशिवे : स्पर्धेमध्ये देशातील विविध भागातून लघुपट - माह्तिीपट आले आहेत. जवळपास ३५ लघुपट व माहितीपट पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून सकाळी ९ वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे. उद्या ( दि.१५) जब्बार पटेल यांचा सिंहासन, जॉन स्टीपसनचा अ‍ॅनिमल फर्म, रामिन बाहराणी यांचा फॅरेनाइट ४५१ हे चित्रपट तर अतुल पेठे यांचा कचरा कुंडी हा माहितीपट पाहायला मिळेल. शनिवारी(दि.१६) मसान, डिडन फिंगर्स, द कुरिअस केस आॅफ बेन्झामीन बॉटम, सुपरमॅन आॅफ मालेगाव तर रविवार (दि.१७) रोजी मृणाल सेन माहितीपट पाहायला मिळेल. त्यानंतर लघुपट व माहितीपट स्पधेर्तील स्क्रीनिंग होईल. सोमवारीही स्पर्धेचे स्क्रीनींग सुरु राहिल. संध्याकाळी सात वाजता स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल.


( व्हिडिओ पाहण्यासाठी Lokmat Ahmednagar या फेसबुक पेजला भेट द्या)

( व्हिडिओ पाहण्यासाठी  https://m.facebook.com/story.php?story_fbid=2280957382229791&id=541922295950969 या लिंकवर क्लिक करा)

 

Web Title: Film Festival that produces a lovely movie: Dr. Bapu Chandan Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.