महामार्गावरील खड्डे बुजवा, बाधकाम विभागासमोर भाजपचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 02:43 PM2020-09-21T14:43:07+5:302020-09-21T14:44:49+5:30

अहमदनगर: महामार्ग तसेच बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई व टाळाटाळी विरोधात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अखेर लेखी आश्वासनंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.

Fill the potholes on the highway, BJP's agitation in front of the construction department | महामार्गावरील खड्डे बुजवा, बाधकाम विभागासमोर भाजपचे आंदोलन 

महामार्गावरील खड्डे बुजवा, बाधकाम विभागासमोर भाजपचे आंदोलन 

Next

अहमदनगर: महामार्ग तसेच बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई व टाळाटाळी विरोधात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अखेर लेखी आश्वासनंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.

 

या वेळी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, रमेश पिंपळे, तालुका सरचिटणीस बाप्पूसाहेब बेरड, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, पोपटराव शेळके, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश लांडगे, तालुका कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख सागर भोपे चिटणीस विक्रम पालवे,  यांच्यासह गणिनीनाथ कांबळे, सुनील म्हस्के, निलेश दरेकर, शिवाजी बेरड, विजय गाडे, स्वप्निल मोरे, राहुल गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पावसाळा सुरु झाल्यापासून सोलापूर, मनमाड, जामखेड, औरंगाबाद, पाथर्डी सह बायपास रोडची अत्यंत दुर्दशा झालेली असून रोडवर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून पाऊस सुरु असताना ग्रामीण भागातील दोन चाकी वाहन चालकांना कसरत करून वाहन चालवावी लागतात. वाहन चालकाने समोरून येणारे वाहन बघायचे की खड्डा आला की नाही यावर लक्ष ठेवायचे ? गेल्या काही दिवसांमध्ये या रोडवरील खड्डे दिसून न आल्यामुळे वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटून नकळत छोटे मोठे अपघात होण्याचे  प्रमाण वाढलेले असून काही जणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झालेल्या आहेत. अश्या प्रकारचे अपघात घडून त्यातून काही विपरीत घडल्यास यास कोण जबाबदार राहणार ? असा सवालही या वेळी उपस्थितांनी केला.   

 

दिलेल्या लेखी आश्वासनाचे पालन प्रशासनाने करावे अन्यथा ग्रामस्थांसह सर्व प्रमुख महामार्गावर अत्यंत तीव्र स्वरूपाचे रस्तारोको आंदोलन करू असा इशाराही या वेळी देण्यात आला.

Attachments

Web Title: Fill the potholes on the highway, BJP's agitation in front of the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.