न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये हाणामारी, ‘या’ तालुक्यात घडली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 PM2021-02-23T16:38:43+5:302021-02-23T16:39:57+5:30

श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी याप्रकरणी तिघा कैद्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fighting among inmates in judicial custody | न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये हाणामारी, ‘या’ तालुक्यात घडली घटना

न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये हाणामारी, ‘या’ तालुक्यात घडली घटना

Next

श्रीरामपूर : येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिघा कैद्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या बराकीत सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे रात्री आलेल्या जेवणात भाजी घेण्यावरून तीन कैद्यांनी एका जणाशी हुज्जत घातली. त्याला पाणी पिण्याच्या भांड्याने मारहाण केली. तिघा जणांच्या आधी जेवण घेतल्याने आलेल्या रागातून हा प्रकार घडला.

या प्रकरणी जखमी संदीप कांबळे याच्या फिर्यादीवरून अक्षय गांगुर्डे, किरण चिकणे, सधीर सरकाळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी व आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहेत. 

Web Title: Fighting among inmates in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.