शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 7:43 PM

साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन भवनात साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डीचे प्रांतअधिकारी रवींद्र ठाकरे आदी बैठकीला उपस्थित होते. ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी उपोषण करण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ही संयुक्त बैठक बोलविली होती. मात्र बैठकीत ऊसदराबाबत तोडगा न निघाल्याने संघर्ष समिती आंदोलनावर ठाम आहे. संघटनांनी आत्मक्लेष करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरील जागा निवडली आहे. या जागेत कुणीही आंदोलन करू नये, असा ठराव ३१ मार्च २०१४ मध्ये लोणी ग्रामपंचायतीने केलेला आहे. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिका-यांना दिली. मात्र जागेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी शेतक-यांच्या वतीने प्रशासनाला ठणकावून सांगितले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, आत्मक्लेष करण्याबाबत प्रशासनाला रितसर निवेदन दिलेले आहे. उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्वचजण गुरुवारी सकाळी तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यास जेलमध्येही आत्मक्लेष केले जाईल. उपोषणाला राज्यातील ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील दररोज किमान ४०० ते ५०० शेतकरी उपोषणाला हजेरी लावतील, असे नवले यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे बाळासाहेब पटारे, कॉ़ बन्सी सातपुते, अजय महाराज बारस्कर, संतोष वाडेकर, अनिल देठे, हरिभाऊ तुवर, रवींद्र मोरे, अनिल इंगळे, विलास कदम, रुपेंद्र काले, चांगदेव विखे, अशोक पठारे, शिवाजी जवरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रावसाहेब लवांडे, बच्चू मोढवे, ताराभाऊ लोंढे, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन आदी बैठकीला उपस्थित होते.