शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
3
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
4
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
5
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
6
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
7
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
8
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
9
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
10
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
11
गुड टच, बॅड टच आणि आता ‘व्हर्च्युअल’ टच!
12
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
13
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
14
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
15
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
16
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
17
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
18
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
19
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
20
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'

तुटपुंजा मदतीचा निषेध करुन शेतक-याने राज्यपालांना पाठविला आठ हजाराचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:18 PM

मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे.

बोधेगाव  : अवकाळी पावसाने खरीप पिकांसह फळे, भाजीपाला आदी लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाईपोटी राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या खरीप पिकांसाठी जाहीर केलेली ही मदत अतिशय तोकडी आहे. त्यातून मशागतीचा खर्चही निघणार नाही. या निर्णयाचा निषेध करत शेतक-यांना हेक्टरी एक लाख रूपयांपर्यंतची भरीव मदतवाढ द्यावी, अशी मागणी करत मुंगी (ता. शेवगाव) येथील रवि रावसाहेब देशमुख या तरुण शेतक-याने आपल्या खात्यावर मदत मिळण्याआधीच एक हेक्टर क्षेत्राचा आठ हजार रूपयांचा धनादेश राज्यपालांना पाठविला आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टने त्यांनी राज्यपालांना हा धनादेश पाठविला आहे. मागील महिन्यात राज्यात सर्वत्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्रशासनाने आपला नुकसानीचा अहवाल शासनाकडे दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रशासकीय आढावा घेत खरीप पिकांसाठी सरसकट हेक्टरी ८ हजार रुपए तर फळबागांसाठी १८ हजार रुपए मदत जाहीर  केली. राज्यपालांनी घोषित केल्याप्रमाणे गुंठ्याला अवघ्या ८० रूपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकºयांना हेक्टरी एक लाख रुपए नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत मुंगी (मूळ गाव उमापूर, ता. गेवराई, जि.बीड) येथील रवि देशमुख या तरुण शेतक-याने ८ हजार रूपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत राज्यपालांना पाठविला आहे. देशमुख यांना साडेसात एकर शेती असून आजोबांच्या नावे मुंगी येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे. धनादेशासोबतच त्याने राज्यपालांना एक पत्रही लिहिले आहे. त्या पत्रानुसार शेतक-यांचे सरसकट कर्ज माफ करून ओला  दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा, पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत  मिळणारी रक्कम वार्षिक ६० हजार रुपए करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी