लॉकडाऊन काळात नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:39+5:302021-04-19T04:19:39+5:30

नेवासा : शहरातील परिस्थितीबाबत रविवारी पोलीस प्रशासन, नगरसेवक, नागरिक, पत्रकार व नगरपंचायत विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस ठाण्याच्या ...

Expect cooperation from citizens during lockdown | लॉकडाऊन काळात नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित

लॉकडाऊन काळात नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित

googlenewsNext

नेवासा : शहरातील परिस्थितीबाबत रविवारी पोलीस प्रशासन, नगरसेवक, नागरिक, पत्रकार व नगरपंचायत विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात आढावा बैठक घेण्यात आली. लॉकडाऊन काळात शहरातील नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा पोलिसांना असेल. त्याचप्रमाणे शहरातील नगरसेवक यांच्या मागे मोठा मानणारा वर्ग आहे, तसेच प्रभागातील नागरिकांच्या परिस्थितीची माहिती सर्व नगरसेवकांना असल्याने सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केेले. यावेळी नगरसेवक सचिन नागपुरे, सचिन वडागळे, संदीप बेहळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान, शांतता कमिटीचे आसिफ पठाण, अल्ताफ पठाण, राजेंद्र मापारी, दत्तात्रय बर्डे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे, पत्रकार अशोक डहाळे, मोहन गायकवाड, शंकर नाबदे, पवन गरुड, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Expect cooperation from citizens during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.