शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

अकोले तालुक्यात गिधाड, चित्रांग नायकूळ, खवल्या मांजराचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:48 PM

कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे.  

संडे विशेष । मच्छिंद्र देशमुख ।  कोतूळ : तालुक्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे.  अकोले तालुक्यातील अभयारण्याची ओळख आता केवळ निसर्गाच्या अविष्कारापुरती उरली नाही. अकोल्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य नष्टप्राय होत चाललेल्या वन्यजीव जीवांच्या अस्तित्वाने हाऊसफुल झाले आहेत राज्यात या अभयारण्याची ही वेगळी ओळख होत आहे.    गेल्या जुलै महिन्यात भंडारदरा परिसरात राज्यातून हद्दपार झालेले वाईल्ड स्वीपर म्हणजे गिधाड सापडले आहे. मांजरे व पट्टा किल्ला, कोतूळ जवळील चिंचखांड घाटात गिधाडांचे अस्तित्व आढळल्याने संपूर्ण राज्यात गिधाडांचे नष्ट झालेले अस्तित्व सिद्ध झाले आहे.     राज्यातील दुर्मिळ चित्रांग नायकूळ नावाचा बीन विषारी साप साधारण चार पाच फूट लांबीचा आढळतो. पाल, सरडे, कीटक हे खाद्य असलेला साप चक्क नऊ फूट लांबीचा आढळून आला. अकोलेचे सर्पमित्र धनंजय मोहिते यांनी हा साप नऊ फूटाचा चित्रांग नायकूळ आहे. अद्याप इतका लांब नायकूळ कधीच सापडला नसल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.   मागील महिन्यात दुर्मिळ बॅन्डेड गेको ही पट्टेरी पाल हरिश्चंद्रगड परिसरात आढळली. पांजरे येथील बेटावर जून महिन्यात खापर खवल्या अर्थात खवले मांजर आढळले. ते खवले दगडासारखे टणक असतात.तो लाजाळू असून धोक्याच्या वेळी फुटबॉलप्रमाणे अंग गोळा करून दूर घरंगळत जातो. छोटे वाहन जरी अंगावरून गेले तरी त्यास इजा होत नाही. या अभयारण्यात  पक्षी, रानगवा, बिबट्या, वानरे, रानडूकरे अशा असंख्य प्राण्यांचे अस्तित्व आहे.जुलै महिन्यात आजारी अवस्थेत दुर्मिळ गिधाड भंडारदरा परिसरात सापडले. संपूर्ण अभयारण्यात आणखी चार ते पाच गिधाड जोड्यांचे अस्तित्व जाणवते, असे कळसूबाई अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले. हरिश्चंद्रगड अभयारण्यात खवले मांजर, बॅन्डेड गेको, चित्रांग नायकूळ या दुर्मिळ प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  वन्यजीवांच्या व अभ्यासकांसाठी आनंदाची बाब आहे, असे  वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.घाटघर परिसरात आढळलेला बिन विषारी चित्रा नायकूळ नऊ फूट लांब होता. तसेच अभयारण्यात अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी मोठ्या संख्येने आहेत, असे  वन्यजीव अभ्यासक डॉ. आकाश देशमुख यांनी सांगितले.         

टॅग्स :forestजंगलAhmednagarअहमदनगर