शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

व्यायाम, आहार अन उपचार पध्दतीने मधुमेहापासून मिळेल सुटका : डॉ. गोपाळ बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 4:21 PM

दिवसेंदिवस देशात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देजागतिक मधुमेह दिन : लोकमत संवाद

अहमदनगर : दिवसेंदिवस देशात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेहाने ग्रासलेले दिसत आहे. उद्या जागतिक मधुमेह दिन आहे. त्यानिमित्ताने डॉ. गोपाळ बहुरूपी यांनी ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद...प्रश्न : मधुमेह होण्याची नेमकी कारणे काय ?डॉ.बहुरूपी : आज मधुमेहाने अनेकांना ग्रासले आहे. अगदी लहान मुलांचाही यामध्ये समावेश आहे. मधुमेह होण्याची तीन कारणे सांगता येतील. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि तिसरे कारण म्हणजे खाण्याच्या वाईट सवयी.प्रश्न- मधुमेह होेऊच नये यासाठी काय करावे ?डॉ.बहुरूपी : अगदी सोपे आहे. मधुमेह झाल्यानंतर ज्या बाबी करायच्या आहेत त्याच बाबी अगोदरपासूनच केल्या तर मधुमेह होणार नाही. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला तर मधुमेहच नाहीत तर अन्य आजारांपासून सुटका होईल.प्रश्न : मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे ?डॉ. बहुरुपी : उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण ८० ते १२० असावे. तर जेवण झाल्यानंतर १२० ते १६० असावे. याप्रमाणे साखरेचे प्रमाण आपण राखू शकलो तर त्रास होणार नाही.प्रश्न : मधुमेह बरा होण्यासाठी नेमके काय करावे ?डॉ. बहुरूपी : मधुमेह बरा होण्यासाठी फक्त चार बाबी गरजेच्या आहेत. नियमित व्यायाम, आहार, डॉक्टरांनी दिलेली गोळ््या-औषधे वेळेवर घेणे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे. या बाबी पाळल्या तर नक्कीच मधुमेहापासून सुटका होऊ शकते.प्रश्न : मधुमेह झाल्यानंतर आहार कसा असावा ?डॉ. बहुरूपी: मधुमेह झाल्यानंतर अनेक पथ्य पाळायला सांगितली जातात. यामुळे पेशंट घाबरून जातात. हे खाऊ नका, ते खाऊ नका असे सांगितले जाते. त्यामुळे वजन कमी होत जाते. दररोेज जेवणात अर्ध्या प्रमाणात फक्त पालेभाज्या खा. याशिवाय बरोबर भात, भाकर, चपाती खाऊ शकता. दाळ खाऊ शकता. अनेकांचे वजन आजारामुळे कमी न होता आहारामुळे कमी होते. केळी, आबा, चिकू आणि सीताफळ ही फळे खाऊ नयेत. उपवास कुठलाही करायाचा नाही. सकाळी नाष्ता, दुपारी अन संध्याकाळी जेवण केले तर मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.प्रश्न : व्यायामाचे महत्व काय आहे.डॉ. बहुरूपी : सर्वच आजारांमध्ये व्यायामाला फार मोठे महत्व आहे. बहुतांशी आजार व्यायामामुळेच बरे होतात. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे फार गरजेचे आहे.प्रश्न : उपचारपध्दती कशी असते.डॉ. बहुरूपी : गोळ््या आणि इन्सुलीनचा यामध्ये समावेश होतो. आहार आणि व्यायामातून आजार बरा होत नसेल तर उपचारपध्दतीचा अवलंब करावा लागतो. इन्सुलीनबद्दल अनेक गैरसमज आहेत. शरीराचा आजार बरा होण्यासाठी इन्सुलीनची गरज असते. त्यामुळे ती द्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांनी गैरसमज करून घेऊ नये.प्रश्न : गरोदर स्त्रीयांनाही मधुमेहाचा त्रास असतो. त्यांनी कशी काळजी घ्यावी.डॉ. बहुरूपी : अनेक गरोदर स्त्रीयांना मधुमेह असतोे. त्यावेळी गोळ््या उपयोगी पडत नाहीत. येथे इन्सुलीनचाच वापर करावा लागतो. आपल्या मुलाला याचा त्रास होईल असे अनेक मातांना वाटते. पण असे काहीही होत नाही. बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास इन्सुलीनमुळे होत नाही.प्रश्न : अनेक वेळा पेशंट घरच्या घरीच गोळ््या-ओषधे घेतात, त्याबद्दल...डॉ. बहुरूपी : काही पेशंट स्वत:च डॉक्टर होतात. थोडेसे बरे वाटले की त्याच गोळ््या सुरु ठेवतात. तपासणी करत नाहीत. पुढे असे पेशंट धोकादायक स्थितीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शरीराबरोबर खेळू नका. वेळोवेळी डॉक्टरांना भेटा. तपासणी करा. निश्चितच तुमचा मधुमेह बरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर