वर्षअखेरच्या दिवशी कोरोनाचे ८४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:17 AM2021-01-02T04:17:09+5:302021-01-02T04:17:09+5:30

अहमदनगर : मार्चपासून जिल्ह्यात रोज शंभरच्या वर कोरोनाच्या रुग्णांची संख्या आढळत होती. २०२० च्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि. ३१) ...

At the end of the year, 84 corona patients | वर्षअखेरच्या दिवशी कोरोनाचे ८४ रुग्ण

वर्षअखेरच्या दिवशी कोरोनाचे ८४ रुग्ण

Next

अहमदनगर : मार्चपासून जिल्ह्यात रोज शंभरच्या वर कोरोनाच्या रुग्णांची संख्या आढळत होती. २०२० च्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि. ३१) प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या खाली, तर उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या खाली आली असून ही बाब दिलासादायक ठरली आहे. दिवसभरात फक्त ८४ जण कोरोनाबाधित आढळले.

जिल्ह्यात गुरुवारी ११५ जणांना घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हेही आता वाढले असून ते ९७.०४ टक्के इतके झाले आहे. सध्या फक्त ९९९ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही प्रथमच एक हजाराच्या खाली आली आहे.

गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२ आणि अँटिजन चाचणीत ३४ रुग्ण असे एकूण ८४ जण बाधित आढळले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४, कर्जत ४, पारनेर १, पाथर्डी ५, राहाता १, संगमनेर २, कँटोन्मेंट बोर्ड १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ७, अकोले २, कर्जत १, कोपरगाव ३, पारनेर १, राहाता १३, राहुरी १, संगमनेर ३, शेवगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन चाचणीत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २, जामखेड २, कर्जत ६, कोपरगाव ७, नगर ग्रामीण २, पाथर्डी १, राहता १, राहुरी १, संगमनेर १०, शेवगाव १, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ६६९७०

उपचार सुरू असलेले रुग्ण : ९९९

मृत्यू : १०४५

एकूण रुग्णसंख्या : ६९०१४

Web Title: At the end of the year, 84 corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.