कोपरगाव तालुक्यातील मोक्कातील दरोडेखोरांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:10 PM2017-11-15T12:10:53+5:302017-11-15T12:11:39+5:30

Empowerment of Dacoits in Mokkak of Kopargaon Taluka | कोपरगाव तालुक्यातील मोक्कातील दरोडेखोरांना सक्तमजुरी

कोपरगाव तालुक्यातील मोक्कातील दरोडेखोरांना सक्तमजुरी

Next

नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील सराईत दरोडेखोर व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेले आरोपी नारायण नामदेव वायकर (३५, रा़ सोनेवाडी, ता़ कोपरगाव, जि़ अहमदनगर), राहुल संजय शिंगाडे (२५, रा़ सोनेवाडी, ता़ कोपरगाव, जि़ अहमदनगर) व सुनील शिवाजी थोरात (२२, रा़ डोºहाळे, ता़ राहाता, जि़ अहमदनगर) या तिघांना जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी मंगळवारी (दि़१४) प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व दहा लाख दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील म्हणून शिरीष कोतवाल यांनी काम पाहिले़
२८ मे २०१५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भाऊसाहेब मोगल गायकवाड व विशाल अंबादास व्यवहारे या दोघांनी टेम्पोमध्ये वडगावपांग येथून कोंबड्यांचे खाद्य भरले व हा माल खाली करण्यासाठी वेस येथे जात होते़ रांझणगावाकडून वेसगावकडे जात असताना रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा टेम्पो अडवला व टेम्पोची चावी काढून घेत गायकवाड व व्यवहारे यांच्याकडील १२ हजार रुपये, मोबाइल, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे घेऊन मारहाण करून फरार झाले़ यानंतर त्यांच्या आवाजामुळे नागरिक जमा झाले व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले़ या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी या गुन्ह्णाचा तपास करून वायकर, शिंगाडे व थोरात या तिघांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्णाची कबुली दिली़ या तिघांनी संघटितपणे केलेले दरोड्याचे गुन्हे पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता़ त्यास तत्कालीन विशेष पोलीस महासंचालक जयजीत सिंग यांनी प्राथमिक मंजुरी दिली होती़ या दरोड्याचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी केल्यानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णलाल विष्णोई यांनी मोक्का लावण्यास परवानगी दिली होती़ सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी या खटल्यात २० साक्षीदार तपासून आरोपींविरुद्ध पुरावे सादर केले होते़
तिघेही सराईत दरोडेखोर
मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेला नारायण वायकर, राहुल शिंगाडे, सुनील थोरात हे तिघेही सराईत दरोडेखोर आहेत़ अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाईकर विरोधात दरोड्याच्या चौदा, शिंगाडे विरोधात दोन तर थोरात विरोधात १३ गुन्हे दाखल आहेत़

Web Title: Empowerment of Dacoits in Mokkak of Kopargaon Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.