कोपरगावातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने काम बंद आंदोलन

By रोहित टेके | Published: March 14, 2023 05:05 PM2023-03-14T17:05:13+5:302023-03-14T17:09:46+5:30

समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

employees at the Samriddhi Highway toll plaza in Kopargaon stop Work due to non-payment of salary | कोपरगावातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने काम बंद आंदोलन

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.१४ )सकाळी टोलनाक्यावरील कामकाज बंद केले. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. 

समृद्धी महामार्गाच्या टोलचे काम पाहणारी कंपनी फास्टगो इन्फ्रारोड वे सोल्युशन कंपनीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकवल्याने संतत्प कर्मचाऱ्यांनी काम बंद करत टोल नाक्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी टोल नाक्यावरील व्यवस्थापक अजित काळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर १५ मार्चला सर्वांचे वेतन जमा होईल  असे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. अर्धा तासाच्या आंदोलनात शेकडो वाहने थांबलेली होती. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
 

Web Title: employees at the Samriddhi Highway toll plaza in Kopargaon stop Work due to non-payment of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.