वयोवृद्ध दाम्पत्याचे आठवड्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:43+5:302021-05-14T04:19:43+5:30

नबीभाई शेख हे मुळा प्रवरामध्ये स्थापनेपासूनचे प्रथम वाहन चालक होते. काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह राहुरी शहरातील बालाजी रोड ...

Elderly couple dies in a week | वयोवृद्ध दाम्पत्याचे आठवड्यात निधन

वयोवृद्ध दाम्पत्याचे आठवड्यात निधन

Next

नबीभाई शेख हे मुळा प्रवरामध्ये स्थापनेपासूनचे प्रथम वाहन चालक होते. काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह राहुरी शहरातील बालाजी रोड परिसरात आपल्या राहत्या घरात सेवानिवृत्त जीवन जगत होते. काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले. या अल्पशा आजारात त्यांचे १ मे रोजी निधन झाले. याच दरम्यान त्यांची पत्नी आशाबी नबीभाई शेख ह्या आजारी पडल्या. एकीकडे पती सोडून गेल्याचे दुःख तर दुसरीकडे अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले. या अल्पशा आजारातच त्यांनी ८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी नबीभाई शेख यांचे वय ८१ वर्षे तर आशाबी शेख यांचे वय ७४ वर्षे होते.

एकाच आठवड्यात या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने राहुरी परिसर, मित्र, नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे चार मुली, चार जावई असा मोठा परिवार असून शहरातील सप्तरंग फोटो स्टुडिओचे संचालक नजीरभाई यांचे ते सासू सासरे होते.

Web Title: Elderly couple dies in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.