शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

अवैध वाळू उपशावर ड्रोनची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:40 AM

जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर करडी नजर ठेवण्यासाठी वाळू साठ्यांवर ड्रोनची नजर राहणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर करडी नजर ठेवण्यासाठी वाळू साठ्यांवर ड्रोनची नजर राहणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सांगितले.अहमदनगर प्रेस क्लबतर्फे मीट द प्रेस या उपक्रमांतर्गत दैनिकांचे संपादक, वरिष्ठ बातमीदार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले, नगर जिल्हा शिकण्यासाठी चांगला आहे. चांगली बातमी यावी, यासाठी काम करीत नाही. जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. शहरातील नागरिक जागरुक असतात. त्यामुळे महापालिकेसंबंधी केलेली कामे माध्यमांमधून जास्त प्रसिद्ध होतात. याचा अर्थ जिल्हा प्रशासनाशी निगडित कामांकडे दुर्लक्ष आहे, असे मुळीच नाही.नगर शहरातील कत्तलखाना, कचरा रॅम्प, मलनिस्सारण व्यवस्था, शहर सुधारित आराखडा, सीना नदी अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई केली.जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर २० दिवसांनी महापालिकेचा कार्यभार आला. यावेळी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनीच सीना नदीकडे लक्ष देण्याबाबत विचारणा केली होती. त्या अनुषंगानेच कारवाई सुरू केली. सीना नदीशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या कारवाईचे स्वागत झाले. काळ लोटला की प्राधान्यक्रम बदलतात. त्यामुळे आता उड्डाणपुलाचे काम व्हावे, याकडे लक्ष आहे. तीन महिन्यात पुलाचे काम सुरू होईल. तीन महिन्यात पुलासाठी जागा देण्याची महापालिकेने हमी दिली की लगेच निविदा उघडणार आहे. याबाबत शुक्रवारी (दि. १८) नियोजन भवनात बैठक आहे.किल्ल्याचे सुशोभिकरणभुईकोट किल्ल्याच्या भोवती जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील लोकांचे किल्ल्याकडे नियमित येणे होईल. त्यानंतर किल्ल्यात काय हवे आहे, याबाबत लोक विचार करू लागतील. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किल्ल्याचे सुशोभिकरण करता येईल. किल्ल्याचा विकास आराखडा मोठा आहे. त्यासाठी एवढा मोठा निधी मिळणे सध्यातरी शक्य नाही, असे द्विवेदी म्हणाले. सध्या सौंदर्यीकरणासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध आहे.वाळू प्रक्रियेत एकच कोन नकोवाळूबाबत एकच दृष्टिकोन ठेवता कामा नये. पोलीस, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महसूल प्रशासन अशा सर्वच स्तराचा वाळूशी संबंध येतो. महसूल प्रशासनात तहसीलदार,मंडलाधिकारी, तलाठी असे घटक आहेत. जिल्ह्यात कुख्यात तस्कर आहेत. अधिकाºयांनाही जीवाची भीती आहे. त्यामुळे आता वाळूसाठ्यांचे ड्रोनद्वारे नियंत्रण करणार आहे. आवश्यक तिथे पोलीस प्रशासनाची माहिती घेतली जात आहे. वाळू तस्करीबाबत प्रशासन गंभीर आहे. तौसिफ शेखची घटना दुर्दैवी आहे. मात्र त्याची दखल घेतली नाही, असे मुळीच नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय