शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

पाथर्डी-नगर बसच्या चालक, वाहकास मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:47 PM

पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी तीन वाजता पाथर्डी आगाराची बस एम. एच. १४, बी. टी. ११५९ ही ...

पाथर्डी : पाथर्डी आगाराच्या नगरहून पांढरीपूलमार्गे पाथर्डीकडे येणाऱ्या बस चालकास जोहारवाडी शिवारात मारहाण करून वाहकाच्या खिशातील तिकिटाची रक्कम ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी तीन वाजता पाथर्डी आगाराची बस एम. एच. १४, बी. टी. ११५९ ही मांडवामार्गे नगरला जात असताना साडेचार वाजण्याच्या सुमारास जोहारवाडी येथे रस्त्यातील खड्यात टँकर गेला असल्याने रस्त्यावर लोक जमा झाले होते. त्यामुळे बस थांबली. रस्ता मोकळा झाल्यानंतर बस पुढे जावू लागली असता बसला तीन ते चार चार इसमांनी आडवे येवून चालकास शिवीगाळ केली. परंतु बस चालक पालवे यांनी बस समजूतदारीने पुढे नेली. दुस-या दिवशी रविवारी सकाळी साडे दहा वाजता बसचालक पालवे व वाहक आशा सुभाष बुळे हे पांढरीपूलमार्गे परत पाथर्डीला येत असताना जोहारवाडी शिवारात कौडगाव आठरे येथील आरोपी लक्ष्मण आश्रुजी आठरे, राजेंद्र जग्गनाथ आठरे व इतर दहा ते पंधरा लोकांनी बसला पिकअप (एम. एच. १६, सी. सी. ४२१) आडवी लावून बसचालक रोहिदास ज्ञानदेव पालवे यांना बसचे खाली ओढून कु-हाड, काठ्या, चैन व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाहक आशा बुळे यांच्याकडील तिकिटाचे जमा झालेले ६ हजार ८४६ रुपये बळजबरीने हिसकावले. बसचालक पालवे यांना झालेल्या मारहाणीत डोक्याला, पाठीला, हात व पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात वाहक आशा बुळे यांनी सरकारी कामात अडथला आणून सरकारी कर्मचा-यास मारहाण करून बळजबरीने रक्कम चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीstate transportराज्य परीवहन महामंडळ