नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 02:24 PM2019-12-08T14:24:13+5:302019-12-08T14:24:39+5:30

प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. 

A dream of raising a disabled but educated unemployed; Divyang Prasad's push | नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड 

नशिबी अपंगत्व पण सुशिक्षित बेरोजगारांना उभे करण्याचे स्वप्न; दिव्यांग प्रसादची धडपड 

Next

बाळासाहेब काकडे ।  
श्रीगोंदा : नगर शहरात शाळकरी विद्यार्थी म्हणून क्रिकेटची अनेक मैदाने गाजविणा-या प्रसाद पंडित याला मस्क्युलर डिस्ट्रिफी या आजाराने कायमचे अपंगत्व आले. अशा परिस्थितीत प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. 
प्रसाद हा नगर शहरातील प्रसिद्ध डिझायनर किरण पंडित यांचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात हुशार खेळात पशुपक्ष्यांची विशेष आवड. एक पाऊल पुढे. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले. शिक्षणातून भविष्याची स्वप्न रंगवत असताना प्रसादला डिस्ट्रिफी आजाराने कायमचे अपंगत्व आले. प्रसादवर लाखो रुपये खर्च करून उपचार करण्यात आले. त्यामुळे पंडित परिवार कमालीचा अडचणीत आला. अशा परिस्थितीत प्रसादने रंगीत माशाच्या जाती बीजकरण व रंगीत माशाचा आहार पाणी यांचा इंटरनेटद्वारे अभ्यास केला. शासकीय प्रशिक्षण घेतले. 
घरातच ब्लुस्टार नावाने घरगुती फिश शॉपचा व्यवसाय सुरु केला. मित्राच्या मदतीने हे रंगीत माशाचे टँक व मासे नगर शहरात ग्राहकांना देण्यासाठी धडपड केली. त्यासाठी अर्शन पठाण, अरुण अब्राहम, अनुराग घिरमिटे या मित्रांनी मदत करण्याची भावना दाखविली आहे.

डिस्ट्रिफी आजाराने माझ्यावर कायमचे अपंगत्व आले. आई, वडिलांनी या आजारातून मुक्तता होण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याने उपयोग झाला. माझे जीवन फक्त घर आणि घरी येणारे मित्र. अशा परिस्थितीत रंगीत मासे पालन व्यवसायाचा अभ्यास केला. या व्यवसायात चांगले दिवस आहेत. मला नगर शहरात एक पेटशॉप सुरु करण्यासाठी वित्तीय संस्थेने मदत केली तर वेळेवर कर्जाची परतफेड करून राज्यात आॅनलाईन सिस्टिमने अनेक पेटशॉप उभे  करण्याचा मानस आहे. यातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे ध्येय आहे, असे प्रसाद पंडित यांनी सांगितले.
कर्जाची फाईल प्रलंबित
स्वत:चे शॉप नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. प्रसादला रंगीत मासे पालन व्यवसायात आशेचे किरण दिसतात. पण मागे कुणाचे पाठबळ नाही. घरची परिस्थिती अडचणीची झाली आहे. अपंग महामंडळाने कर्जाची फाईल पेंडीग ठेवली आहे ही चिंतेची बाब आहे. पण मदतीचे हात पुढे आले तर या व्यवसायातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे प्रसादने नियोजन केले आहे. 

Web Title: A dream of raising a disabled but educated unemployed; Divyang Prasad's push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.