ईव्हीएमवर शंका : ९ मतदारसंघाच्या वोटिंग-काऊंटिंगमध्ये तफावत;  संगमनेर, शिर्डी, नेवाशात आकडेवाडी तंतोतंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:43 PM2019-11-02T14:43:16+5:302019-11-02T14:44:41+5:30

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी ९ मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली मतांची आकडेवारी यात तफावत आढळत आहे. केवळ संगमनेर, शिर्डी, नेवासा या तीनच मतदारसंघात ही आकडेवारी जुळते.

Doubts on EVM: ९ Voting-counting of constituencies; Sangamner, Shirdi, Nevasha in statistics | ईव्हीएमवर शंका : ९ मतदारसंघाच्या वोटिंग-काऊंटिंगमध्ये तफावत;  संगमनेर, शिर्डी, नेवाशात आकडेवाडी तंतोतंत

ईव्हीएमवर शंका : ९ मतदारसंघाच्या वोटिंग-काऊंटिंगमध्ये तफावत;  संगमनेर, शिर्डी, नेवाशात आकडेवाडी तंतोतंत

googlenewsNext

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी ९ मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली मतांची आकडेवारी यात तफावत आढळत आहे. केवळ संगमनेर, शिर्डी, नेवासा या तीनच मतदारसंघात ही आकडेवारी जुळते . त्यामुळे इतर ठिकाणी ईव्हीएमवर शंका उपस्थित होत आहेत. 
राज्यातील बºयाच ठिकाणी ईव्हीएममधील मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. राज्यातील ११४ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीत कमी मते आढळली आहेत.  तर मतदानापेक्षा मतमोजणीत जास्त मते आढळलेली ५९ मतदारसंघ आहेत.
 ११५ ठिकाणी ही आकडेवाडी जुळलेली आहे. त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश आहे. नगरमधील संगमनेर, शिर्डी, नेवासा या ३ मतदारसंघात ही आकडेवारी तंतोतंत बरोबर आहे. तर अकोले, कोपरगाव , श्रीरामपूर, शेवगाव व पारनेर या ५ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीतील मतांची संख्या जास्त आहे. राहुरी, नगर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड या ४ मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीतील मतांची संख्या कमी आहे. 
जिल्ह्यात सरासरी ६९.४३ टक्के मतदान झाले. एकूण २४ लाख ११ हजार ६८१ मतदारांनी  ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. परंतु जेव्हा २४ आॅक्टोबर रोजी ईव्हीएममधील मतांची मोजणी झाली तेव्हा मतांच्या आकड्यांत तफावत आढळली. त्यामुळे ईव्हीएमवर अनेकांकडून शंका उपस्थित होत आहेत. निवडणूक शाखेत याबाबत विचारणा केली असता अद्याप आमच्याकडे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून अंतिम आकडेवारी आली नसल्याचे सांगितले जात आहे. 
 नगर उपजिल्हा निवडणूक अधिका-यांच्या सहीने जाहीर झालेली अंतिम मतदानाची आकडेवारी व मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर  उपलब्ध असलेली मतांची आकडेवारी गृहित धरून ही तफावत आढळत आहे. 

Web Title: Doubts on EVM: ९ Voting-counting of constituencies; Sangamner, Shirdi, Nevasha in statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.