विभागीय उपआयुक्तांनी घेतला आपल्या गावातील कोरोना उपाययोजनाचा आढावा. पळवेतील दक्षता समितीशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:52 PM2021-05-17T12:52:45+5:302021-05-17T12:53:20+5:30

पळवे (ता. पारनेर)  : नाशिक विभागीय उपआयुक्त गोरक्ष गाडिलकर सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण विभागात कार्यमग्न आहेत. कामाचा व्याप मोठा आहे. आपल्या मुळगावी पळवे (ता. पारनेर) येथे संसर्ग वाढत असल्याचे कळताच ऑनलाईन ग्रामस्थांशी संपर्क करुन संसर्ग रोखण्यावर उपाययोजना सुचविल्या.

The Divisional Deputy Commissioner took stock of the Corona measures in his village. Discussion with the vigilance committee in Palwa | विभागीय उपआयुक्तांनी घेतला आपल्या गावातील कोरोना उपाययोजनाचा आढावा. पळवेतील दक्षता समितीशी चर्चा

विभागीय उपआयुक्तांनी घेतला आपल्या गावातील कोरोना उपाययोजनाचा आढावा. पळवेतील दक्षता समितीशी चर्चा

Next

पळवे (ता. पारनेर)  : नाशिक विभागीय उपआयुक्त गोरक्ष गाडिलकर सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण विभागात कार्यमग्न आहेत. कामाचा व्याप मोठा आहे. आपल्या मुळगावी पळवे (ता. पारनेर) येथे संसर्ग वाढत असल्याचे कळताच ऑनलाईन ग्रामस्थांशी संपर्क करुन संसर्ग रोखण्यावर उपाययोजना सुचविल्या.


पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे कोरोना संसर्ग वाढत आहे. या कारणास्तव विभागीय उपआयुक्त गोरक्ष गाडिलकर यांनी आपल्या मुळ गावातील ग्राम दक्षता समिती तसेच तरुन कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आणि अडचणीवर मार्गदर्शन केले. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने शेजारील तेरा गावातील लोकांची लस घेण्यासाठी तसेच तपासणीसाठी ये -जा सुरु असते.  त्यातील लोकांशी संपर्क होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.  लक्षणे दिसता तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. एक पाॅझिटिव्ह आला तर घरचे आणि शेजारील अशी वीस जनांची तपासणी करण्याचा सल्ला गाडिलकर यांनी दिला. लवकरात लवकर उपचार घेतल्यास कोरोनातून धोका निर्माण होत नाही. शिवाय  दवाखान्यातून आल्यावर सक्तीने दहा दिवस विलगिकरण केलेच पाहिजे.  संतुलीत आहार आयसोलेट आणि डायट विलगीकरण तसेच प्राणायाम, योगासणे या गोष्टींवर भर दिला की संसर्ग आपोआप थांबेल आणि गाव कोरोनामुक्त होईल, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

गावातील तरुण नेतृत्व संजय तरटे अंबादास तरटे, अमोल शेळके विजय जगताप यांनी आपले मते नोंदवून उपाययोजना करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यामध्ये गावात कोविड सेंटर उभारणे, क्वाटॅक्ट ट्रेडिंग करणे आदी वर चर्चा झाल्याने विभागीय आयुक्त गाडिलकर हे प्रत्यक्ष वेळ काढून नियोजनासाठी येत असल्याचे सांगितले. ग्रामस्थांशी थेट नाशिक वरुन झूम मिटींग द्वारे संपर्क करुन उपाययोजनेविषयी चर्चा केल्याने मोठा आधार आणि समाधान लाभल्याचे ग्रामस्थ दिलीप शिंदे यांनी लोकतमशी बोलताना मत व्यक्त केले.

Web Title: The Divisional Deputy Commissioner took stock of the Corona measures in his village. Discussion with the vigilance committee in Palwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.