पारगाव तालुका दौंड येथे बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 05:15 PM2019-11-03T17:15:39+5:302019-11-03T17:15:47+5:30

पारगाव तालुका दौंडनजीक 22 फाटा येथे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याने जिवंत कोंबड्या फस्त केल्या.

Dissatisfied at Paragaon Taluka Daund | पारगाव तालुका दौंड येथे बिबट्या जेरबंद

पारगाव तालुका दौंड येथे बिबट्या जेरबंद

Next

अहमदनगरः पारगाव तालुका दौंडनजीक 22 फाटा येथे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याने जिवंत कोंबड्या फस्त केल्या. सदर घटना शनिवार 2 रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास घडली. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याचा वावर होता यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार वनखात्याला निवेदने व मागणी केल्यानंतर वन खात्याने नुकताच या ठिकाणी पिंजरा लावला होता.

पिंजरा लावते वेळी सदर पिंजऱ्यामध्ये दोन जिवंत कोंबड्या पिंजऱ्याला बांधण्यात आला होता. सदर कोंबड्यांचा आवाज ऐकून बिबट्याने त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्याच्या शोधार्थ धाव घेतली. तात्काळ बिबट्या अडकला. विशेष म्हणजे पिंजऱ्यामध्ये अडकून सुद्धा बिबट्या कोंबडा खाण्यामध्येच दंग होता. अडकल्यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाची संपर्क केला. त्यानंतर रात्री उशिरा वनविभाग आणि सदरचा बिबट्या जुन्नर येथील बिबट्या केंद्रांमध्ये रवाना केला. या कामी स्थानिक युवक सागर गोलांडे, रोहिदास ताकवणे, रुपेश ताकवणे, निलेश ताकवणे, वैभव नामदेव गोलांडे आदी युवकांनी परिश्रम घेतले. गेल्या सहा महिन्यांमध्ये पारगाव व देलवडी परिसरामध्ये वनविभागाला तीन बिबटे पकडण्यामध्ये तीनदा यश आले.
 

Web Title: Dissatisfied at Paragaon Taluka Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.