शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नाव नाही घेतले : लग्नात निवेदकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:31 PM

लग्नसमारंभात स्वागतासाठी नाव न घेतल्याने तिघांनी निवेदकाला त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली़ २४ फेब्रुवारी रोजी नगर तालुक्यातील खोसपुरी येथे ही घटना घडली़

अहमदनगर : लग्नसमारंभात स्वागतासाठी नाव न घेतल्याने तिघांनी निवेदकाला त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली़ २४ फेब्रुवारी रोजी नगर तालुक्यातील खोसपुरी येथे ही घटना घडली़ या गुन्ह्यातील आरोपींवर एमआयडीसी पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने फिर्यादीने मंगळवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे़खोसपुरी येथील हरिभाऊ किसन हारेर हे २४ फेब्रुवारी रोजी राहुरी येथे पाहुण्यांच्या लग्नसमारंभात गेले होते. लग्नात ते निवेदक म्हणून काम पाहत होते. लग्न आटोपल्यानंतर याच लग्नात उपस्थित असलेले सोमनाथ रंगनाथ हारेर, बंडूपंत रंगनाथ हारेर व संतोष गंगाधर हारेर यांनी खोसपुरी येथे हरिभाऊ यांच्या घरी जाऊन लग्नात स्वागतासाठी आमचे नाव का घेतले नाही, अशी विचारणा करत मारहाण केली़ या घटनेनंतर हरिभाऊ यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ हरिभाऊ यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून सोमनाथ, बंडूपंत व रंगनाथ हारेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ गुन्हा दाखल होऊनही आरोपींविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने हरिभाऊ यांनी अधीक्षकांना निवेदन दिले आहे़ संबंधित आरोपी पोलिसात तक्रार केली म्हणून वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर आरोपींची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असून, यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर