शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा उत्सवानिमित्त देवगडला भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:27 PM

त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

 नेवासा : त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. वेदमंत्रांच्या जयघोषात धार्मिक कार्यक्रम पार पडले.   कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यानिमित्ताने देवगडच्या गंगाघाटावर हजारो भाविकांनी गंगास्नान केले. प्रवरामाईला पंचारती ओवाळून पूजा केली. मंदिर प्रांगणात विधीवत पूजेने त्रिपुरा वाती पेटविल्या. मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये असंख्य जोडप्यांनी देखील कार्तिक स्वामींच्या चांदीच्या मूर्तीस अभिषेक घातला. कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने पहाटे चार वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी झाली होती. त्यानंतर गर्दीचे रूपांतर दर्शनबारीत झाले. दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांशी सुसंवाद साधत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी स्वागत केले. उत्सवानिमित्त मंदिराच्या बाहेरील प्रांगणात दुकाने थाटली होती. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कणकोरी, जामगाव, गळनिंब येथील भक्त परिवाराच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.मंगळवारी दुपारी बारा वाजता झालेल्या महाआरती प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत राजस्थान येथील भागवताचार्य महंत परमपूज्यनीय पवनकुमार मालोदिया महाराज हे उपस्थित होते. मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येकाच्या हातात कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस सर्वांचे आकर्षण ठरले होते. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून भक्त परिवाराने स्वयंसेवकांची भूमिका मोठी जबाबदारी पार पाडली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDatta Mandirदत्त मंदिर