चिंचोलीगुरवच्या उपसरपंचपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:30+5:302020-12-14T04:33:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सिंधूबाई यमाजी गोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात ...

As the Deputy Panch of Chincholigurav | चिंचोलीगुरवच्या उपसरपंचपदी

चिंचोलीगुरवच्या उपसरपंचपदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सिंधूबाई यमाजी गोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चिंचोलीगुरव ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे व थोरात साखर कारखान्याचे माजी संचालक हौशीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व आहे. उपसरपंच बाबासाहेब सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाल होते. उपसरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली. उपसरपंचपदासाठी सिंधूबाई गोडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधात कुणीही अर्ज न भरल्याने सिंधूबाई गोडगे यांनी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी सरपंच प्रमिला रमेश बर्डे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब सोनवणे, संपतराव सोनवणे, राधा गोसावी, पल्लवी आभाळे, सरला सोनवणे, भास्कर बर्डे उपस्थित होते. विरोधी गटाचे चारही सदस्य यावेळी गैरहजर राहिले.

Web Title: As the Deputy Panch of Chincholigurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.