जामखेड येथे वंचितचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:03+5:302021-03-06T04:21:03+5:30

जामखेड : तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत व देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य ...

Deprived movement at Jamkhed | जामखेड येथे वंचितचे आंदोलन

जामखेड येथे वंचितचे आंदोलन

Next

जामखेड : तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत व देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतीष पारवे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते अरुण डोळस, मच्छिंद्र जाधव, विशाल जाधव, विशाल पवार, बाळगव्हाणचे सरपंच कृष्णा खाडे, उपसरपंच राहुल गोपाळ घरे, योगेश सदाफुले, राकेश साळवे, दीपक माळी, नामेश धायतडक, कुंडल राळेभात, देवा देवकर, संदीप धायतडक, दिनेश ओहोळ आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जाधव म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कायदे देशातील शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला उद्ध्वस्त करणारे व भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे आहेत. ते कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून देशातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहोत. पाऊस, वादळ, वारा व थंडी आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर या आंदोलनकर्त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी केंद्र सरकार या आंदोलनकर्त्यांचे दखल घेत नाही.

---

०५ जामखेड आंदाेलन

जामखेड तहसीलसमोर वंचितच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

Web Title: Deprived movement at Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.