शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मन करारे प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:44 PM

आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल.

अध्यात्म विशेष / आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल. आपणास प्रश्न पडेल मन हे इंद्रिय आहे का ? हो पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व अकराव मन आहे. मन हे न दिसणार परंतु वायूपेक्षा अफाट वेग असलेल इंद्रिय आहे. आपल्या  म्हणूनच आपण सहजच म्हणतो त्यांची मन:स्थिती ठीक नाही. मन उदास आहे मन प्रसन्न वाटत वगैरे. मध्यंतरी आंध्रप्रदेशात डॉक्टर मुलीवर घडलेल्या अमानुष बलात्काराची घटना असो की निर्भयाची. अशा घटना देश विदेशात सातत्याने घडतात. निषेध, मोर्चे निघतात. आपण हळहळतो. विविध यंत्रणेला दोष देतो. मन खिन्न होते. असे प्रसंग आपल्या वाट्याला नकोत अशी काळजी मनात निर्माण होते. तर कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या  बातम्या ऐकल्या की आपल्या सैनिकाप्रती किंवा त्यामागे असणाºया खंबिर मनाच्या नेतृत्वाप्रती आभिमानाने ऊर भरुन येतो. दोन्हीही घटना या मनातील कुविचार व सामर्थ्यशाली विचारामुळे घडतात हे आपल्या लक्षात येईल. कुविचारी प्रवृत्तीला सुसंस्कृत करावे लागेलच. परंतु कुप्रवृत्तीकडुन अचानक होणाºा अन्यायाविरुध्द प्रतिकार करणाºया दुबळ्यामनोवृत्तीला खंबिर पणाचे संस्कार करावे लागतील. हा विषय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांना लागु पडेल. या विश्वातील प्रत्येकाची धडपड आनंदासाठी, यशासाठी असते. प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षा  असते की सर्वात गुणवंत यशस्वी मुले आमची असावीत. समाज हे मोठे विद्यापीठ आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथील लोकांच्या वागण्या-बोलण्यातून एकमेकांच्या मनावर न कळत संस्कार होत असतात. मग ते शिक्षक असो, मित्र असो की आई वडील. समाजातील आदर्श व्यक्ती, उपासना, पंथ आदी मनावर संस्कार घडवितात.  -राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक