शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

दीनमित्र, कलापथकाद्वारे सत्यशोधक शाखांचा प्रचार-जी. ए. उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:25 PM

गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली.

चंद्रकांत गायकवाड ।  तिसगाव : सोमठाणे (ता. पाथर्डी) येथे सत्यशोधक समाज शाखेची स्थापना १९०६ मध्ये झाली. यादवराव मल्हारी शिदोरे या शाखेचे उपाध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाचे पाचवे दोन दिवशीय अधिवेशन ११ व १२ मे १९१५ रोजी अहमदनगर येथे त्यावेळचे गंगाधर बागडे नाट्यगृह (छाया सिनेमागृह) येथे पार पडले. या अधिवेशनाच्या खर्चास यादवराव यांनी सर्वाधिक म्हणजे २५ रूपये (आजचे २५ हजार रूपये) निधी दिला होता. गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली.२९ डिसेंबर २०१९ रोजी ‘दीनमित्र’च्या छापखाण्याचा वाडा दुर्लक्षित व ५ जानेवारी २०२० रोजी ‘दीनमित्र’च नव्हे तर दोन काव्यखंड राक्षसगण नाटकाची सोमठाणेच जन्मभूमी, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हे गाव पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर उगले यांनी गुरुवारी सोमठाणे येथे भेट दिली व तेथील रहिवाशांसी संवाद साधला. दीनमित्रच्या सुरुवातीच्या काही अंकांत यादवराव शिदोरे यांचेही लेखन प्रसिद्ध होत असे. यादवराव यांच्या अथक प्रयत्नांनी सोमठाणेत प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यांना कृष्णराव नावाचा एक मुलगा होता. तो अहमदनगर कोर्टात नोकरीस होता. सीताराम, मुंजाबा असे दोन बंधू त्यांना होते. त्यांचाही दीनमित्रमध्ये लेखन सहभाग होता. धुराजी कान्होजी शिदोरे कलापथकाचे व्यवस्थापक होते. अशा तत्कालीन प्रकाशित झालेल्या नोंदी उगले यांनी यादवराव शिदोरे यांचे पुतणे जगन्नाथ आणी नातू कानिफनाथ, दिलीपराव, पंडितराव तर हरिभाऊ शिदोरे यांचे नातू संभाजी यांना दाखविल्या.सोमठाणेत ‘दीनमित्र’चा शताब्दी सोहळा..२१ जानेवारी २०१९ ला ‘दीनमित्र’चे शताब्दी वर्षे आहे. सोमठाणेचे यादवराव शिदोरे अन् तरवडीचे मुकुंदराव पाटील यांच्या तिस-या पिढीचे वंशज सोमठाणेच्या वाडावस्तीवर या निमित्ताने एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार आहेत. त्याबाबतही गुरूवारी उत्तमराव पाटील व शिदोरे बंधूंमध्ये भ्रमणध्वनीवरून संवाद झाला.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSomthanaसोमठाणाPathardiपाथर्डीhistoryइतिहास